Crop insurance was paid by 1.95 lakh farmers in Solapur district sakal
सोलापूर

जिल्ह्यातील १.९५ लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

यंदाच्या खरिपासाठी एक लाख २९ हजार २५६ हेक्‍टरवरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-२०२२ या योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ५८३ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. यंदाच्या खरिपासाठी एक लाख २९ हजार २५६ हेक्‍टरवरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील १५ कर्जदार शेतकऱ्यांनी व एक लाख ९५ हजार ५६८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप विमा योजनेत सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेच्या माध्यमातून ६१८ कोटी रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. विम्याच्या हप्त्यापोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १२ कोटी ५६ लाख रुपये जमा केले आहेत

यंदाच्या खरीप विमा योजनेत राज्य हिस्सा म्हणून शासनाने ५३ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत. केंद्र हिस्सा म्हणून शासनाने ५३ कोटी ६१ लाख जमा केले आहेत. शेतकरी, राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा असा एकूण सोलापूर जिल्ह्यासाठी ११९ कोटी ७७ लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. २०२१ च्या खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातून दोन लाख २२ हजार ४१२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले होते. २०२१ च्या तुलनेत यंदा ८७.९४ टक्के शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-२०२२ मध्ये सहभाग घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT