deleopment funds Mohol taluka is far from development ajit pawar visit mohol on saturday solapur esakal
सोलापूर

कोटयावधीचा निधी येऊन ही मोहोळ तालुका विकासापासुन कोसो दुर!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार ता 30 रोजी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर

राजकुमार शहा

मोहोळ : सोलापूर पुणे महामार्गावरील व राज्याच्या नकाशावरील मोहोळ तालुका. तालुक्यातुन दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. अनेक नैसर्गिक सोयीसुविधा उपलब्ध असणारा हा तालुका कोट्यावधीचा निधी येऊनही विकासापासून कोसो दूर आहे. कोट्यवधीचा निधी येऊनही नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा आज पर्यंत मिळल्या नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार ता 30 रोजी मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या येण्याने सर्वसामान्यांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत. तब्बल अडीच वर्षानंतर मोहोळ तालुक्यात येणारे उपमुख्यमंत्री पवार तालुक्याला काय गिफ्ट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहोळ शहरासह तालुक्याला मोठा राजकीय वारसा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही काही दिवस तालुक्याची ख्याती होती, मात्र परिस्थिती बदलली. तालुक्यातील अनेक विकासाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. नागरिकांना आश्वासना शिवाय अध्यापावेतो काहीही पदरात पडले नाही. तालुक्यात उच्च व्यवसायिक शिक्षण सुविधा नाहीत त्यात इंजिनिअरिंग कॉलेज व अन्य बाबींचा समावेश आहे त्यामुळे शिक्षणासाठी सोलापूरला जावे लागते ,बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. तालुक्यात मोठी अशी चिंचोली औद्योगिक वसाहत आहे, मात्र ती नावालाच तालुक्यात आहे. ती जास्त सोलापुर शी कनेक्ट आहे. सर्व कामगार वर्ग सोलापुरातील आहेत, तर चंद्रमौळी औद्योगिक वसाहत ही शहराजवळ आहे पण तिचा असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. व्यापारी व कारखानदार यांना त्या ठिकाणी कुठल्याही सोयीसुविधा नाहीत परिणामी जुने उद्योग बंद पडत चाललेत तर नवीन उद्योग येईनात.

शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले असले तरी त्यांना जोडणारे गावापर्यंत च्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्याकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष न जिल्हापरिषदेचे. ज्यांच्यावर सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे अशा पोलिसांना राहण्यासाठी शहरात घरे नाहीत. निधी मंजूर झाल्याची घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही. मोहोळला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कुठल्याही विभागातील कर्मचारी मोहोळला बदली झाली म्हणले की नाक डोळे मुरडतो, वेळ प्रसंगी तो परस्पर बदली करून घेतो. राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग तसेच पालखी मार्ग तालुक्यातून गेल्याने अपघाताचे मोठे वाढते प्रमाण आहे. मोहोळ शहरात ग्रामीण रुग्णालय आहे.मात्र त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अनेक सोयीसुविधा नाहीत त्यामुळे अपघात झाला की जखमीला सलाईन लावून सोलापूर पर्यंत जाण्याकरिताचा हा दवाखाना असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आहे या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयात दर्जा देण्याची शहरवासीयांची अनेक वर्षाची मागणी आहे मात्र अद्याप त्याची पूर्तता झाली नाही.

तालुक्यातील विविध विभागांच्या कार्यालयाला प्रभारी चा शाप आहे अपवाद वगळला तर पंचायत समिती, शिक्षण, पशुवैद्यकीय,वन, सार्वजनिक बांधकाम या महत्त्वाच्या विभागाचा कारभार प्रभारी वर चालतो, अनेक जागा रिक्त आहेत त्या तातडीने भरणे गरजेचे आहे. मोहोळ शहर वासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यातही वणवण करावी लागते, त्यासाठी रात्रंदिवस कष्ट घ्यावे लागतात. गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून चा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे, त्यावर मोठे राजकारण झाले, अनेकांनी सत्ता भोगली मात्र आश्वासना शिवाय नागरिकांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार या सर्वावर मार्ग काढतील काय ?अशी विचारणा सर्वसामान्यांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT