31Corona_20akola_2001_1_3.jpg 
सोलापूर

गर्दी वाढली पण टेस्टिंग झाले कमी ! आज 392 संशयितांमध्ये 13 पॉझिटिव्ह

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळीनिमित्ताने शहरात जागोजागी मोठी गर्दी होऊ लागली आहे. शासनाने तथा महापालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होऊ लागले असून पाचपेक्षा अधिक व्यक्‍ती एकत्रितपणे दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर संशयितांचे टेस्टिंग वाढविण्याची गरज व्यक्‍त होत आहे. मात्र, आज 392 जणांचीच टेस्ट करण्यात आली असून त्यात 13 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती व्यक्‍त होत असतानाच टेस्टिंग कमी झाल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

शहरासंबंधी ठळक बाबी...

  • आतापर्यंत एक लाख चार हजार 954 संशयितांची झाली टेस्ट
  • एकूण टेस्टमध्ये आढळले नऊ हजार 808 व्यक्‍ती पॉझिटिव्ह
  • आज 392 संशयितांची झाली टेस्ट; आज 13 जण कोरोना बाधित
  • आतापर्यंत आठ हजार 830 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • सद्यस्थितीत शहरातील 435 रुग्णांवर सुरु आहेत उपचार

शहरात आज होटगी नाका, मुरारजी पेठ, होमकर सोसायटी (मजरेवाडी), ज्योती नगर (आकाशवाणी रोड), किसान नगर (सूत मिलजवळ), उत्तर कसबा आणि ढंगे रेसिडेन्सी (शेळगी) येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर उत्तर सदर बझार येथे तीन रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या संपर्कातील 101 संशयितांना होम क्‍वारंटाईन करण्यात आले आहे. तर 49 जण इन्स्टिट्यूशन क्‍वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे 21 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. महापालिकेने गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना आवाहन केले असून मास्क वापरा, दोन मिटरचे अंतर ठेवा, 20 सेंकद सलग हात स्वच्छ धुवा, असा संदेश दिला आहे. मात्र, शहरात खरेदीनिमित्ताने गर्दी वाढली असून नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिस तथा महापालिकेचा एकही कर्मचारी दिसत नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT