Police Chowk 
सोलापूर

पोलिस ठाण्यांमधून कामकाजामुळे बसतोय भ्रष्टाचाराला खो ! चौक्‍या पडल्या ओस; आली कामकाजात पारदर्शकता

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहर पोलिस आयुक्‍तालयातील पोलिस चौक्‍यांचे कामकाज हे पोलिस ठाण्यांमधून होऊ लागल्याने पोलिस चौक्‍या ओस पडल्याचे चित्र दिसत आहे, तर पोलिस ठाण्यांमधील कामकाज वाढल्याने पोलिस ठाण्यांमधून नागरिकांची वाढती गर्दी दिसत आहे. पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्या या निर्णयामुळे गुन्हे दाखल न करणे आणि भ्रष्टाचाराला चांगलाच खो बसल्याचे दिसत आहे. यामुळे गुन्ह्यांची संख्या जरी वाढली असली तरी कामकाजामध्ये पारदर्शकता आल्याचे दिसून येत आहे. 

सोलापूर पोलिस आयुक्‍तालयामध्ये फौजदार चावडी, जेलरोड, सदर बझार, विजापूर नाका, सलगर वस्ती, जोडभावी पेठ आणि एमआयडीसी पोलिस ठाणे अशी 7 पोलिस ठाणी आहेत. या पोलिस ठाण्यांतर्गत शहरात 28 पोलिस चौक्‍या आहेत. त्यामध्ये फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवी वेस, कसबा, मार्केट, तरटी नाका, बाळे, मरिआई चौक आणि आयुर्वेदिक पोलिस चौकी आहे. 

जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशोक चौक, बेगम पेठ आणि साखर पेठ पोलिस चौकी आहे. सदर बझार पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोदी, सदर बझार, शास्त्री नगर, रेल्वे स्टेशन आणि सिव्हिल पोलिस चौकी आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत आयटीआय, औद्योगिक वसाहत, जुळे सोलापूर आणि सैफुल पोलिस चौकी आहे. सलगर वस्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामवाडी व देगाव पोलिस चौकी आहे. जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जोडभावी पेठ, मंगळवार पेठ, सम्राट चौक आणि शेळगी पोलिस चौकी आहे. एमआयडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नई जिंदगी, विडी घरकुल आणि एमआयडीसी पोलिस चौकी आहे. 

पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी सोलापुरात रुजू झाल्यानंतर पोलिस चौक्‍यांमधून चालणारे कामकाज पूर्णपणे बंद करून ते कामकाज पोलिस ठाण्यांमधून चालू केले. त्यामुळे पोलिस चौकीला तक्रारदार किंवा नागरिकांची होणारी गर्दी पूर्णपणे बंद होऊन पोलिस ठाण्यांकडे गर्दी वाढली. यापूर्वी पोलिस चौकीतून कर्मचारी गुन्हे दाखल करताना अनेक चुका व नागरिकांना त्रास देण्याचे काम करीत होते, हे वरिष्ठांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता एखाद्या तक्रारदाराला तक्रार दाखल करायची असल्यास थेट पोलिस ठाण्यात जावे लागते. यामुळे अनेक गैरप्रकार रोखले गेल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जाते. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांकडून होणारे त्रास व नंतर गुन्हे दाखल न करण्याचे प्रकार होत असल्याच्या प्रकारांना आता आळा बसल्याचे दिसून येत आहे. 

गुन्ह्यांमध्ये वाढ 
तक्रारदार पोलिस ठाण्यामध्ये आल्यानंतर अधिकाऱ्यांसमोर त्याला उभे करून नंतरच गुन्हे दाखल केले जात असल्यामुळे हद्दीतील प्रत्येक घटनेवर अधिकाऱ्यांचे लक्ष राहात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या तपासाचे कामकाज हे पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांकडून होत आहे. प्रत्येक तक्रारदाराची तक्रार नोंदविली जात असल्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. 

पोलिस चौक्‍यांचे कामकाज पोलिस ठाण्यांमधून होऊ लागल्याने पोलिस ठाण्यामध्ये प्रत्येक तक्रारदार येऊ लागल्याने व त्यांना प्रत्येक घटनेविषयी माहिती मिळू लागल्याने अधिकाऱ्यांना तक्रारदारांना तत्काळ मदत, न्याय देता येऊ लागला आहे. तसेच पोलिस ठाण्याच्या हद्दीत अधिकाऱ्यांना प्रभाव वाढविणे सोपे होऊ लागले आहे. प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारीचे निरसन होऊ लागले आहे. 
- अंकुश शिंदे, 
पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर आयुक्‍तालय 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT