The crushing season of 9 out of 39 factories in Solapur district has started 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 39 पैकी नऊ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात असलेल्या खासगी व सहकारी तत्वावरील 39 साखर कारखान्यांपैकी आज अखेरपर्यंत नऊ साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाला शुभारंभ झाला आहे. या नऊ साखर कारखान्यांमध्ये सहा खासगी कारखाने तर तीन सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. 

भैरवनाथ शुगर युनिट नंबर 3, इंद्रेश्वर शुगर, सिद्धनाथ शुगर, विठ्ठल कार्पोरेशन, दि. सासवड माळी शुगर, लोकनेते बाबुराव पाटील ऍग्रो इंडस्ट्रिज, कै. विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना या कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाला शुभारंभ केला आहे. 

यंदाच्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख 93 हजार 754 मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. या गाळपातून तीन लाख 58 हजार 430 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत झालेल्या ऊस गाळपातून जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा हा 7.26 टक्के मिळाला आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू होतील असा अंदाज आहे. 

नुकसानग्रस्त उसाला प्राधान्य द्या 
सोलापूर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व नदी, नाले व ओढ्यांना आलेला महापुरामुळे ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी नुकसानग्रस्त उसाला प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT