4sancharbandi.jpg 
सोलापूर

शहरात संचारबंदी लागू ! रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत घराबाहेर फिरु नका 

तात्या लांडगे

सोलापूर : ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्याने सावधगिरी म्हणून राज्य सरकारने राज्यातील सर्वच शहरांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्र संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्‍यक कामांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी आदेश काढत संचारबंदी आज (मंगळवारी) रात्री 11 पासून लागू होईल, असे स्पष्ट केले.

ठळक बाबी... 

  • शहरात मंगळवारपासून (ता. 22) रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत असेल संचारबंदी 
  • 5 जानेवारीपर्यंत शहरात राहणार कडक संचारबंदी; विनाकारण घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल 
  • कोविड विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लागू केली रात्र संचारबंदी 
  • आदेशाचे उल्लंघन केल्यास आत्पत्कालीन कायद्याअंतर्गत होणार कारवाई 
  • सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

रात्र संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्वच आस्थापना रात्री 11 नंतर सुरु राहणार नाहीत. नागरिकांनी रात्री 11 पूर्वी घरी जाणे अपेक्षित आहे. या काळात दिवसा घराबाहेर पडणाऱ्यांचीही तपासणी केली जाणार आहे. विनाकारण तथा नियमांचे उल्लंघन करीत शहरात इतरत्र फिरणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. तरीही ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसराच विषाणू आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका व पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. या काळात परदेशातून येणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्‍तींना क्‍वारंटाईन करुन त्यांची 'आरटीपीसीआर' टेस्ट केली जाणार आहे. त्र, आपल्याकडे विमानसेवा नसल्याने परदेशातून कोणी येणार नाही, अशी शक्‍यता महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्तविली आहे. तरीही बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर तथा व्यक्‍तींवर वॉच राहील, असे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT