34sancharbandi.jpg 
सोलापूर

संचारबंदीचा आदेश ! मास्क नसल्यास एक हजाराचा दंड; कोचिंग क्‍लासेस बंद तर यात्रा, उत्सवासही बंदी 

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा राज्यभर जोर वाढू लागल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने सावध पवित्रा घेत 25 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्‍लासेस पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांची शाळा सुरु राहणार आहे.

आदेशातील ठळक बाबी... 

  • अत्यावश्‍यक सेवा वगळता कोणत्याही व्यक्‍तीस 25 फेब्रुवारी ते 7 मार्च या काळात रात्री 11 ते पहाटे पाच या वेळेत घराबाहेर पडता येणार नाही 
  • दुध, भाजीपाला, फळे या जीवनावश्‍यक वस्तूंसह वृत्तपत्र सेवा आणि इतर अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांसाठी असेल सवलत 
  • जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा (दहावी-बारावी वगळून) व महाविद्यालये, खासगी शिकविणी पूर्णपणे बंद राहतील 
  • जिल्ह्यातील अभ्यासिका, ग्रंथालये शासकीय निर्बंध पाळून 50 टक्‍क्‍यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्यास परवानगी 
  • मंगल कार्यालये सुरुच राहतील, पण 50 लोकांच्या मर्यादचे बंधन पाळावेच लागेल; विवाहासाठी पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक 
  • सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 11 पर्यंत सुरु राहतील; त्यातील उपस्थिती मात्र, 50 टक्‍केच असावी 
  • सर्व प्रकारचे खेळाचे सामने, स्पर्धा रद्द कराव्यात; 7 मार्चपर्यंत कोणत्याही सामन्यांसाठी नसेल परवानगी 
  • सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी (रेल्वे स्थानक, बस स्टॅण्ड, हॉस्पिटल, प्राथर्नास्थळे) अशा ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक 
  • मास्क न वापरता फिरणाऱ्यांना आता भरावा लागेल एक हजार रुपयांचा दंड 
  • स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक शौचालये, बस व रेल्वे स्थानकांच्या ठिकाणी करावे निर्जंतुकीकरण 

संचारबंदी काळात शहर- जिल्ह्यातील मंगल कार्यालयांना परवानगी असणार आहे. मात्र, विवाहावेळी 50 व्यक्‍तींपेक्षा अधिक संख्या आढळल्यास मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई करुन गुन्हाही दाखल केला जाणार आहे. तर या काळात मंदिरे, धार्मिक स्थळे सुरु राहणार आहेत. मात्र, यात्रा, उरुस, उत्सवास बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही खेळांचे सामने या कालावधीत घेतले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोरोना वाढणार नाही, यादृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Noise : पुण्यात डीजेपुढे पोलिस हतबल!, पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट अन् दादागिरीची भाषा; ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’

विद्यार्थिनीवर कथित अत्याचाराचा मेसेज व्हायरल; विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केली तोडफोड, राष्ट्रीय महामार्गही रोखून धरला

IND vs WI, 1st ODI Weather : पहिल्या सामन्यात पावसाचा अडथळा येणार? तिरुअनंतपुरममध्ये कसे आहेत हवामान अंदाज, घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : ही लोकशाहीची हत्या : संजय राऊत

Theatre and Memories : नाटक संपतं, पण वस्तूंच्या आठवणी राहतात; ‘बेगम बर्वे’पासून ‘गोदो’पर्यंतचा रंगानुभव

SCROLL FOR NEXT