पुण्याहून हेलिकॉप्टरने आणून लावले पुतणीचे लग्न Sakal
सोलापूर

काकांची हौस! पुण्याहून हेलिकॉप्टरने आणून लावले पुतणीचे लग्न

जातेगावातील काकांची हौस! पुण्याहून हेलिकॉप्टरने आणून लावले पुतणीचे लग्न

नाना पठाडे

स्वतःच्या मुलीचे हौसेने लग्न लावणारे वडील खूप आहेत; पण भावाच्या मुलीचीसुद्धा लाखो रुपये खर्च करून हौस पूर्ण करणारे चुलते असावे लागतात.

पोथरे (सोलापूर) : स्वतःच्या मुलीचे हौसेने लग्न लावणारे वडील खूप आहेत; पण भावाच्या मुलीचीसुद्धा लाखो रुपये खर्च करून हौस पूर्ण करणारे चुलते असावे लागतात. अशापैकीच जातेगाव (ता. करमाळा) (Karmala) येथील दादासाहेब वारे आहेत. वारे यांनी भावाची मुलगी व जावई यांना पुणे (Pune) ते करमाळा हेलिकॅप्टरने (Helicopter) आणून पुतणीचा अविस्मरणीय विवाह (Marriage) सोहळा संपन्न केला आहे. त्यामुळे दादासाहेब वारे यांनी भावाच्या व आपल्या मुलीत भेद न मानता एकत्रित कुटुंब पद्धतीचा मोठा आदर्श निर्माण केला आहे.

जातेगाव (ता. करमाळा) येथील दादासाहेब वारे व नानासाहेब वारे हे दोघे भाऊ पुणे येथे लेबर कॉन्ट्रॅक्‍टर म्हणून काम करत आहेत. भाऊ नानासाहेब यांची कन्या माधुरी वारे हिचा विवाह देवळाली येथील मनोज दिलीप सुर्वे यांच्याशी करण्याचे ठरले. त्यामुळे भावाच्या मुलीचा विवाह सोहळा शाही थाटात करण्यासाठी दादासाहेब वारे यांनी पुढाकार घेतला व यासाठी त्यांनी वधू-वराला पुणे ते करमाळा हेलिकॉप्टरमधून आणायचे ठरवले. त्यानुसार खराडी येथील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टर उडवण्यात आले. यामध्ये वधू माधुरी वारे, वर मनोज सुर्वे, वडील नानासाहेब वारे, चुलते दादासाहेब वारे, आजी इंदुमती वारे, वराचे भाऊ सूरज सुर्वे या हेलिकॉप्टरमध्ये बसले.

हेलिकॉप्टरमधून पिंपरी- चिंचवड येथील निगर्डे येथील संत बाळूमामाच्या मंदिरावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर करमाळा येथील कमालाभवानी मंदिराला दोन प्रदक्षिणा व जातेगाव येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराला दोन प्रदक्षिणा घालून करमाळा येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या ठिकाणावरून पोथरे येथील आनंदी मंगल कार्यालयात नवरा-नवरीला आणून विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यातून दादासाहेब वारे यांनी भावाचे कसे संबंध व ऋणानुबंध असावे लागतात, हे दाखवून दिले आहे.

मुलांपेक्षाही मुलीला आम्ही जास्त प्राधान्य देतो. शिवाय ती भावाची मुलगी आहे, असा प्रश्न माझ्या मनात कधीही येत नाही. त्यामुळे मी पुणे ते करमाळा हेलिकॉप्टरमध्ये आणून पुतणीचे लग्न लावले.

- दादासाहेब वारे, जातेगाव, ता. करमाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT