solapur city police sakal
सोलापूर

सोलापूर शहरात आता बेशिस्त वाहनांवर दररोज कारवाई! ५२५ बुलेटच्या सायलेन्सरवर चालविला रोडरोलर; प्रत्येकास एक हजाराचा दंड

सोलापूर शहरातील सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. सायलेन्सर, नंबरप्लेट मॉडिफाईड करणाऱ्यांसह बेशिस्त रिक्षा चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरात विशेष मोहिमांद्वारे कारवाई करण्याचे नियोजन केले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : बुलेटचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे मॉडिफाईड सायलेन्सर बसविणाऱ्या बुलेटराजांवर सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत वाहतूक पोलिसांनी तब्बल ५२५ मॉडिफाईड सायलेन्सर काढून जप्त केले. त्या सायलेन्सरवर आज (मंगळवारी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोडरोलवर चालविण्यात आले.

सोलापूर शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या दुचाकी वाहनांमध्ये बुलेटची संख्या मोठी आहे. बुलेट घेतल्यावर हौसी तरूण त्याचे सायलेन्सर मॉडिफाईड करतात. त्यामुळे रूग्णालये, शाळा-महाविद्यालयांसमोरील रोडवरून ये-जा करताना त्या सायलेन्सरच्या मोठ्या आवाजाचा सर्वांना त्रास होतो. त्यासंबंधीच्या तक्रारी वाहतूक पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस निरीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे व उत्तर विभागाचे पोलिस निरीक्षक सुरज चाटे यांच्या नेतृत्वात अंमलदारांनी मॉडिफाईड बुलेटवर कारवाई केली.

१ जानेवारी ते ३१ मे या पाच महिन्यात उत्तर विभागाने ११५ तर दक्षिण विभागाने ४१० मॉडिफाईड सायलेन्सर जप्त केले. त्या प्रत्येक दुचाकीस्वारांकडून एक हजार रूपयांप्रमाणे एकूण पाच लाख २५ हजार रूपयांचा दंड केला आहे. सायलेन्सर किंवा नंबरप्लेटमध्ये बदल केल्यास वाहतूक नियमानुसार एक हजार रूपयांचा दंड होतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेशिस्त वाहनांवर आता दररोज कारवाई

सोलापूर शहरातील सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. सायलेन्सर, नंबरप्लेट मॉडिफाईड करणाऱ्यांसह बेशिस्त रिक्षा चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरात विशेष मोहिमांद्वारे कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. बेशिस्त वाहनांवरील कारवाईची मोहीम दररोज सुरू राहील.

- गौहर हसन, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : लालबाग राजाची मिरवणूक २२ तासांनी गिरगाव चौपाटीवर

Chh. Sambhajinagar: गणेश विसर्जनावेळी जीवघेणा प्रसंग; गणेश भक्ताला जीवनरक्षक दलाने दिले वेळेवर जीवनदान

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

SCROLL FOR NEXT