The onion auction stalled within six thousand sakal
सोलापूर

सोलापूर बाजार समितीत कांद्याचे दररोज लिलाव! सरासरी भाव १४०० रुपयांवर; अवघ्या १५ क्विंटल कांद्याला मिळाला ३२०० रुपयांचा दर

सोलापूर बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १८) ८८८ गाड्यांमधील कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडले. मागील दहा दिवसांच्या तुलनेत सोमवारी कांद्याची आवक काही प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळाले. तरीपण दर कोसळले असून प्रतिक्विंटल सरासरी भाव चौदाशे रुपयांवर आला आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : आठवडाभराच्या गोंधळानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. १८) ८८८ गाड्यांमधील कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडले. मागील दहा दिवसांच्या तुलनेत सोमवारी कांद्याची आवक काही प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळाले. तरीपण दर कोसळले असून प्रतिक्विंटल सरासरी भाव चौदाशे रुपयांवर आला आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारच्या तुलनेत कांद्याची आवक जवळपास चारशे गाड्यांनी घटली आहे. मात्र, दरात सुधारणा न होता कांद्याचे दर प्रतिक्विंटल दोनशे रुपयांनी घसरले. शनिवार आणि रविवार या दोन दिवसाच्या सुट्टीनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होईल, असा अंदाज होता. त्यामुळे बाजार समितीने ६०० गाड्यांचाच लिलाव होईल, असे स्पष्ट केले होते. पण, दोनशे ते अडीचशे गाड्या गेटबाहेर उभा केल्याने टोकन पद्धतीला शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर बाजार समिती प्रशासनाने टोकनचा निर्णय मागे घेतला. रविवारपासून कांदा घेऊन येणारी वाहने रात्री दहा वाजेपर्यंत जनावर बाजार आवारात उभी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे सोमवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

८८ हजार क्विंटल आवक; दरात दोनशे रुपयांची घट

सोमवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक घटली होती. तत्पूर्वी, शुक्रवारी बाजारात एक लाख १७ हजार ७९६ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर सोमवारी ८८ हजार ८१३ क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. आवक घटल्यानंतरही दरात सुधारणा न झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. सोमवारी सोलापूर बाजार समितीत ८८ हजार ७७६ क्विंटल कांदा सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा विकला. अवघ्या १५ क्विंटल कांद्याला ३२०० रुपयांचा दर मिळाला.

दक्षिणेत कांद्याच्या दरात तेजी

सोलापूरच्या तुलनेने दक्षिण भारतातील बाजारपेठेत कांद्याच्या दरात तेजी आल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर परिसरातून बंगळुरु येथे विक्रीस नेलेल्या कांद्याला सोमवारी तीन हजार रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून बंगळुरुला कांदा नेण्याचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे.

बंगळुरू येथे सोलापूरपेक्षा चांगला भाव

सोमवारी बेंगलोर येथे मी चारशे पिशवी कांदा विक्रीसाठी नेला होता. उच्च प्रतिच्या कांद्याला २९०० रुपये तर दुय्यम प्रतिच्या खांद्याला प्रतिक्विंटल २६०० रुपयांचा दर मिळाला.

- शहाजी पवार, शेतकरी, गावडी दारफळ, उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT