Solapur dance bar Esakal
सोलापूर

Dance Bar: कारवाईच्या धास्तीने सोलापुरातील डान्स बारमधील ‘छमछम’ अखेर बंद

कॅसिनो बारचा परवाना रद्दचा प्रस्ताव; अन्य कारवाईच्या रडारवर

सकाळ डिजिटल टीम

सोलापूरच्या संस्कृतीवर घाला घालण्याबरोबरच, इथलं समाज मन चिंतातूर बनविण्याला कारणीभूत ठरण्यासह येथील तरुणाई भिकेकंगाल होऊन अनेकांचे संसार देशोधडीला लावणाऱ्या सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील डान्स बारमधील ‘छमछम’ अखेर ‘खाकी’च्या कारवाईच्या धास्तीने सध्या तरी बंद झाली आहे.

दरम्यान, कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तसेच कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवरील कारवाईनंतर आता अन्य ऑर्केस्ट्रा बार कारवाईच्या रडारवर असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून मुख्यत्वे सोलापूर शहर हद्दीबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बारचे पेव फुटले होते. पैशांची उधळण, हिडीस अन् अश्लील नृत्यांचा नंगानाच, हाणामाऱ्या, डान्स बारच्या आडून चालणारा सेक्स बाजार, भिकेकंगाल झालेली तरुणाई, देशोधडीला लागलेले संसार आणि एकूण चिंतातूर झालेले सोलापूरचे समाजमन असा सर्व प्रकार डान्स बारच्या परिणामातून उमटत होता.

तथापि, एज्युकेशन अन् मेडिकल हब तसेच स्मार्ट सिटी सोलापुरात डान्स बार चालण्यामधून उद्‌भवत असलेल्या परिस्थितीचा विचार करता, नेहमीच समाजमनासोबत राहून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आणि विकासात्मक तसेच विधायक पत्रकारितेचा बाज ठेऊन सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या ‘सकाळ’ने येथील डान्स बार विरोधात मोहीम उघडली.

‘सोलापुरी छमछम, उद्‌ध्वस्त संसार अन्‌ भिकेकंगाल तरुणाई’ या सनसनाटी वृत्तमालिकेच्या माध्यमातून येथील डान्स बारचे ‘पोस्ट मार्टम’ करत नतद्रष्ट डान्स बार चालण्याच्या जळजळीत परिणामांचे सत्य समोर आणले. डान्स बार विरोधात ‘सकाळ’ने उघडलेल्या मोहिमेसोबत सोलापूरच्या समाजमनाचा हुंकार राहिला.

सकाळने यासाठी विशेष ‘भूमिका‘ही घेतली. या महत्त्वाच्या टप्यावर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने तसेच ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ’सकाळ’च्या डान्स बार विरोधी भूमिकेला पाठिंबा दिला. त्यानुसार येथील डान्स बार कारवाईच्या कक्षेत आले आहेत.

पालकमंत्री म्हणाले, आता जबाबदारी संबंधित ठाणे प्रमुखाची

ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार चालत असतील किंवा कायदा पायदळी तुडवत ऑर्केस्ट्रा बार चालविले जात असतील त्या ठिकाणच्या या प्रकाराला संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असतील. या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले. त्यामुळे डान्स बार हद्द, संबंधित पोलिस ठाणे आणि त्या ठिकाणचे पोलिस अधिकारी असे वर्तुळ डान्स बारच्या कारवाईसंबंधी राहणार आहे.

डान्स बारच्या विरोधात ‘सकाळ’चा लढा कायमच

ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली सुरु असलेल्या डान्स बार विरोधात सध्या पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. मात्र डान्स बार चालविण्याला पुढच्या काही दिवसात अनुकूल वातावरण होईल, पुन्हा छमछम सुरु करता येईल, असा डान्स बार चालकांना विश्‍वास आहे. मात्र जागल्याची भूमिका, सामाजिक बांधिलकी आणि सोलापूर शहर-जिल्ह्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन डान्स बारच्या विरोधात ‘सकाळ’चा लढा कायमच असेल.

कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्यासंदर्भात आज मंगळवारी (ता.२३) जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय या ऑर्केस्ट्रा बारचा चालक अमोल चव्हाण याच्यासह ३१ जणांना जामिनावर सोडण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करून कोर्टात दोषारोप पत्र पाठविण्यात येणार आहे. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील सहापैकी तीन ऑर्केस्ट्रा बार चालू आहेत. त्यापैकी ‘कॅसिनो’ वर कारवाई करण्यात आली आहे. अन्य ऑर्केस्ट्रा बार ठिकाणी काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई करून परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.

- नामदेव शिंदे, पोलिस निरीक्षक,

सोलापूर तालुका पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे अपडेट्स! केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी काय महत्त्वाचं?

Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! श्रमजीवीच्या मोर्चामुळे वाहतुकीत बदल, अनेक रस्ते बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

Breast Cancer: पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका; 'या' बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra Live News: शिरूर नगर परिषदेत भाजपच्या ११ नगरसेवकांचा सत्तापक्षाला पाठिंबा

Pune News : ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख कधी मिळणार? ‘बार्टी’चा सात तर ‘सारथी’चा तीन महिन्यांपासून प्रभारींच्या हाती कारभार

SCROLL FOR NEXT