सोलापूर

तू मला आवडतेस... माझ्यासोबत लग्न कर..!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : तू मला आवडतेस... माझ्यासोबत लग्न कर... असे म्हणून विजयपूर रस्त्यावरील हत्तूर येथील कलवरी नृत्याविष्कार बारमधील डान्सर मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मॅनेजर शरण नागनाथ बसप्पा (रा. कलबुर्गी, कर्नाटक) याची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सोलापूर महापालिकेचा मोठा निर्णय...काय तो वाचा !

विश्रांती कक्षात केला विनयभंग
कलवरी नृत्याविष्कारमधील अल्पवयीन महिला डान्सरने तिने केलेल्या कामाचे पैसे मॅनेजर शरण याच्याकडे मागितले. माझी आजी आजारी आहे, तिला दवाखान्यात ऍडमिट केले आहे. माझे पैसे द्या, मला माझ्या गावी जाऊन यायचे आहे, असे ती शरणला म्हणाली. त्यानंतर शरण याने विश्रांती कक्षात जाऊन तू मला आवडतेस, माझ्यासोबत लग्न कर... असे म्हणून तिचा विनयभंग केला.

सोलापुरकरांसाठी खुशखबर...जिल्हा रुग्णालय पूर्ण होणार दिड वर्षात ​

तुम्ही असे करू नका..
माझे दुसऱ्या मुलाबरोबर लग्न ठरले आहे, तुम्ही असे करू नका... असे म्हणून डान्सर मुलीने शरण यास टाळले. तुला पैसे देत नाही, तुला काय करायचे आहे ते कर... असे म्हणून शरण याने त्या मुलीला शिवीगाळ केली. हा प्रकार मुलीने मित्राला सांगितला. त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तिने विजापूर नाका पोलिसांत जाऊन फिर्याद दिली. या प्रकरणात शरण यास अटक करण्यात आली असून त्याची सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT