Darshan pass found on the website of Vitthal Mandir Samiti 
सोलापूर

विठ्ठल मंदिर समितीच्या वेबसाईटवर मिळाले दर्शन पास

भारत नागणे

पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. असे असतानाही राज्यभरातील अनेक भाविकांनी आज आॅनलाईन दर्शन पास काढल्याची धक्कादायक बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातील काही भाविकांना मंदिर समितीच्या आॅनलाईन बुकींग दर्शन या वेबसाईटवरुन दर्शन पास मिळाले आहेत. दरम्यान मंदिर समितीने वेबसाईट बंद न केल्याने हा गोधळ उडाल्याचे समोर आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्च पासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून यावर्षीचा आषाढी पायी वारी सोहळा देखील रद्द करण्यात आला आहे.

1 जुलै रोजी पंढरपुरात भरणारी आषाढी यात्रा देखील रद्द केली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना पंढरपुरात येण्यास मनाई केला आहे. ऐवढेच नाही तर पंढरपूर शहर व परिसरातील सुमारे 450 मठ दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचे आदेश ही दिले आहेत.

 जिल्हा प्रशासनाने यापूर्वी चैत्री यात्रेसह अनेक धार्मिक कार्यक्रम व सोहळे रद्द केले आहेत. वारी काळात भाविकांनी पंढरपुरात येऊ नये असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने कऱण्यात आले आहे.

अशा परिस्थितीमध्ये मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन आज भाविकांनी 12 जून 2020 रोजीच्या सकाळी 8 वाजताचे आॅनलाईन दर्शन पास काढले आहेत. बुल़डाणा येथील अनेक भाविकांनी असे दर्शन पास काढून घेतले आहेत. बेवसाईटवरुन पास काढल्याची माहिती मिळताच राज्यभरात  मोठी खबळबळ उडाली आहे.

आज बुलडाणासह राज्यभरातील शेकडो भाविकांनी दर्शन पास काढल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन बंद केल्यानंतर ही मंदिर समितीची वेबसाईट सुरुच असल्याने प्रकार घडल्याचे समितीच्या लक्षात आल्यानंतर वेबसाईट बंद केली आहे.

१२ जूनला मिळेल दर्शन

आज मंदिर समितीच्या वेबसाईटवरुन दर्शनपास मिळाले. 12 जून रोजी सकाळी 8 ते 9 वाजताची वेळ देण्यात आली आहे. दर्शन मिळणार असल्याने आम्ही गाडीही बुकिंग केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून दर्शन मिळणार आहे, 

- जनार्दन बांगल, भाविक बुलडाणा

वेबसाईट तातडीने बंद केली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. मंदिर सुरु करण्याबाबत अजूनही कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. मंदिर समितीची बेवसाईट चालू होती. त्यावरुन आज अनेक भाविकांनी दर्शन पास काढले आहेत. त्यानंतर तातडीने मंदिर समितीने वेबसाईट बंद केली आहे. भाविकांनी पंढरपुरात येवू नये.

- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक विठ्ठल मंदिर समिती, पढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

Pune School Controversy: शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे कापले केस; स्वतंत्र शुल्क आकारल्याची माहिती

SCROLL FOR NEXT