The daughter of a farmer has success various posts in the mpsc exam for three consecutive years 
सोलापूर

शेतकऱ्याच्या मुलीची सलग तीन वर्ष राज्यसेवेच्या विविध पदांना गवसणी 

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (ता. माढा, जि. सोलापूर) : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची परंतु, अधिकारी होण्याचा दृढ निश्‍चय, त्यामुळे परिस्थीतीचा बाऊ न करता अपार कष्ट, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर गेली 3 वर्षापासून राज्यसेवेच्या एक-एक पदाला गवसणी घालत नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये मोहोळ तालुक्‍यातील खुनेश्वरच्या कन्या रत्नमाला गायकवाड यांनी यंदाच्या वर्षी उत्पादन शुल्क पोलिस उपअधिक्षक या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. सध्या त्या उस्मानाबाद जिल्ह्यात उपशिक्षणधिकारीपदी कार्यरत आहेत. 
रत्नमाला गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण खुनेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण मोहोळच्या कन्या प्रशालेत तसेच पदवीचे शिक्षण कोल्हापूर येथुन तर पदवित्तोर शिक्षण राहुरी कृषी विद्यापीठ येथून पुर्ण केले. येथील शिक्षण सुरू असतानाच त्यांनी सनदी अधिकारी होण्याचा ठाम निश्‍चय केला. घरची परिस्थिती हलाखीची वडिल शेती करायचे. वडील शेती करून शिक्षणासाठी पैसे पुरवयाचे. त्यामुळे त्यांना घरच्या परिस्थितीची जाण असल्याने, मी अधिकारी होणारच हा ठाम निर्णय करून त्या 2015 पासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होत्या. पहिल्या प्रयत्नात त्यांची वनधिकारी म्हणून निवड झाली होती. परंतु त्यांना पाहिजे ते अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे त्या पुन्हा अभ्यासाच्या तयारीला लागल्या व दुसऱ्या प्रयत्नात त्यांची उपशिक्षणधिकारीपदी निवड झाली. एका सामन्या कुटूंबातील शेतकऱ्याची मुलगी सलग एकापाठोपाठ दोन्ही परिक्षेत यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. परंतु मी अजून थोडा प्रयत्न केला तर राज्यसेवा आयोगाच्या सर्वाच्च पदावर विराजमान होऊ शकते, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने त्यांनी प्रयत्न सुरू केला. या काळात त्यांच्या यशाच्या वाटचालीत भागीदार असलेल्या त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले. त्यामुळे त्या खचल्या पण जिद्द सोडली नाही, अभ्यासात सातत्य ठेवले. व नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये त्यांची उत्पादन शुल्क पोलिस उपअधिक्षक या पदासाठी निवड झालेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. त्यांच्या या यशात वडिल, भाऊ, चुलते अनिल बोराडे यांचे सहकार्य लाभले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT