crime 
सोलापूर

रंगपंचमी दिवशीच त्यांनी धूम ठोकली अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रंगपंचमी दिवशी अजय कोळी याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे. अजयच्या आई- वडिलांनी तुमची मुलगी घरी पोहोच करतो, म्हणूनही अद्याप मुलीला घरी सोडले नसल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


रंगपंचमीचा आनंदोत्सव साजरा करताना घरातील दोन भाऊ बाहेर गेले होते. घरातील बोअर बंद पडल्याने वडिल फोरमनला घेवून दुरुस्तीचे काम करण्यात व्यस्त तर आई स्वंयपाकात गुंग होती. दरम्यान, अल्पवयीन मुलगी घराबाहेर गेल्याचे आई-वडिलांना समजले. त्यानंतर मुलीचे आई-वडिल आजूबाजूला चौकशी करीत असताना त्यांना मुलगी अजय कोळी या तरुणासोबत बोलत उभी असल्याचे काहींनी सांगितले. त्याठिकाणी मुलीचे आई- वडिल पोहचले मात्र, दोघेही तिथे नव्हते. त्यावेळी ते कोळीच्या घरी पोहचले परंतु, अजयच्या कुटुंबियांनाही तो कुठे गेला आहे, याची माहिती नसल्याचे समजले. त्यावेळी अजयच्या वडिलांनी उरळी कांचन येथील त्याचा मित्र शुभम गायकवाडला फोन केला. त्यावेळी तो म्हणाला, अजयचा फोन आला होता आणि तो रात्री 8 च्या सुमारास माझ्याकडे येणार आहे. त्यानंतर मुलीचे व अजयचे पालक उरळी कांचनाला पोहचले. मात्र, अजय त्याठिकाणी आला नसल्याचे दिसून आले आणि त्याबद्दल शुभमला विचारले. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अजयच्या वडिलांनी तुमची मुलगी घरी पोहोच करतो म्हणाले आणि मुलीचे पालक सोलापुरात आले. मात्र, अद्याप त्यांनी मुलीला घरी सोडले नसल्याने तिच्या पालकांनी विजापूर नाका पोलिसांत अजय कोळीविरुध्द फिर्याद दिली. त्यानुसार अजय कोळी याच्याविरुध्द पोक्‍सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


चारित्र्याचा संशय घेवून शिक्षकाकडून विवाहितेचा छळ 
सोलापूर : मुलीचा डिसेंबर 1996 मध्ये जिवराज अनंतरनाथ खोबरे (रा. भवानी पेठ, सोलापूर) याच्याशी विवाह झाला. दोन वर्षे व्यवस्थीत नांदवले आणि त्यानंतर घरातील कामावरुन जिवराज याने मुलीचा सतत मानसिक छळ सुरु केला. मी एक आदर्श शिक्षक असून तु दहावी शिकलेली, तुझी माझ्यासोबत संसार करण्याची लायकी नसल्याचे म्हणून शिवीगाळ, मारहाण करीत होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेवून त्रास दिल्याने तिने घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची फिर्याद मयत मुलगी रत्नप्रभा यांचे वडिल विठ्ठल रामराव कासार यांनी जोडभावी पोलिसांत दिली. त्यानुसार संशयीत आरोपी जिवराज खोबरेविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT