dcc bank loan not illegal adv abhijit kulkarni court hearing update solapur Sakal
सोलापूर

Solapur News : डीसीसीची कर्जे न्यायालयाने बेकायदा ठरवली नाहीत; ॲड. अभिजित कुलकर्णी

जिल्हा बँक सुनावणीत आज पुन्हा उलट तपास

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सन २०१२ पासून ठेवीदारांच्या रक्कम अदा करण्यात कोणतीच बँकेकडून कसूर नाही. बँकेची आर्थिक परिस्थिती कर्जे अदा करून देखील भक्कम होती. उच्च न्यायालयात देखील बँकेने आर्थिक परिस्थिती भक्कम असल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

त्यावर, उच्च न्यायालयाने कोणतेही प्रतिकूल मत व्यक्त केले नाही. सोलापूर डीसीसी बँकेने दिलेली कर्जे दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असूनही उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली नसल्याचा मुद्दा ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी सोमवारी उपस्थित केला.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल व भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व यांचे वकील ॲड. अभिजित कुलकर्णी यांनी घेतला. जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या माजी संचालक,

अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी चौकशी अधिकारी तथा निवृत्त अपर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांच्यासमोर सुरू आहे. ॲड. कुलकर्णी यांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विलास देसाई यांचा उलट तपास सुरू आहे. या प्रकरणाचा उलट तपास उद्याही (मंगळवार, ता. २१) होणार आहे.

आज झालेल्या उलट तपासात ॲड. कुलकर्णी म्हणाले, संचालक मंडळाने मंजूर केलेला ठराव बँकेच्या प्रशासनाला बंधनकारक नाही. संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावावर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडणारी कोणतीही तरतूद उपविधीत नाही.

जर ठराव कोणत्याही नियमाचे उल्लंघन करणारा आहे, असे प्रशासनाला वाटत असेल मग, ठरावाची अंमलबजावणी न करणे प्रशासन टाळू शकते. कर्ज मंजूर करणे व कर्ज रक्कम अदा करणे, या सर्वस्वी दोन वेगळ्या बाबी आहेत.

केवळ कर्ज मंजूर केल्याने व ठरावाचे बंधन बँकेच्या प्रशासनावर नसल्याने संचालक मंडळाकडून बँकेचे नुकसान नाही. नाबार्ड ही केंद्रीय यंत्रणा असून सहकार राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य व्यवस्थेमुळे नाबार्डला सहकार क्षेत्राला निर्देश देण्याचे अधिकार नाबार्ड कायद्यात नाही.

परंतु, सहकार खात्याच्या सर्व अहवालांची भिस्त नाबार्ड या केंद्रीय यंत्रणेच्या निकषांवर आहे. नाबार्डच्या पत्रात कर्ज वाटपाचे निकष ठरवू शकतील अशी कोणतीही कायद्याची तरतूद नाही. नाबार्डच्या या निकषांना कोणतेही वैधानिक बळ नाही. ते केवळ मार्गदर्शनासाठी आहे. नाबार्डचे सर्व अहवाल प्राथमिक अहवाल आहेत.

नैसर्गिक संकटाचा फटका

सन २०१२-१३ च्या दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून त्यानंतर सन २०१४ साली जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला अवकाळी व गारपिटीमुळे मोठा फटका बसला आहे.

नैसर्गिक आपत्तीचा परिणाम साखर उद्योगावर झाला. दुष्काळाचा मोठा परिणाम अखेर बँकेवर झाला. तथापि, आरबीआयने २०१५ पर्यंत संचालक मंडळ बरखास्त करण्यास सहमती दर्शविली नाही, उलट आरबीआयने बँकेला त्याच्या निकषांमध्ये मजबूत आर्थिक स्थितीत ठेवण्याच्या संचालक मंडळाच्या प्रयत्नांचे ॲड. कुलकर्णी यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT