dcc bank solapur 
सोलापूर

मोठा निर्णय ! 'डीसीसी' देणार शेतकऱ्यांना गावातच पाच लाखांपर्यंत थेट कर्ज

तात्या लांडगे

सोलापूर : राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे कर्जासाठी जाणाऱ्या बळीराजाला आता जिल्हा मध्यवर्ती बॅंक दोन ते पाच लाखांचे मॉरगेज कर्ज देणार आहे. विकास कार्यकारी सोसायट्यांशिवाय बॅंक निरीक्षकांच्या माध्यमातून हे कर्जवाटप केले जाणार आहे. बॅंकेची 102 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) लोकनेते बाबुराव (आण्णा) पाटील सभागृहात पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भात आता धोरण निश्‍चितीचे काम सुरु झाले आहे.

बॅंके अशाप्रकारे देणार थेट कर्ज
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्हाभर 208 शाखा आहेत. बॅंकेकडे सुमारे 75 बॅंक निरीक्षक आहेत. एखाद्या शेतकऱ्याने बॅंकेच्या कोणत्याही शाखेकडे मॉरगेज लोनची मागणी केल्यास संबंधित शेतकऱ्याची मालमत्ता, शेतातील पिकांची पाहणी संबंधित बॅंक निरीक्षक करेल. बॅंक निरीक्षकाची खात्री झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने मागणी केलेला कर्जाचा अर्ज बॅंकेच्या मुख्य शाखेकडे पाठविला जाईल. त्यानंतर बॅंक त्या शेतकऱ्याला कर्जवाटप करणार आहे. नियमित कर्जदार, नवे सभासदांनाच अशाप्रकारचे कर्ज मिळणार आहे.

बॅंक पातळीवर शंभर टक्‍के व संस्था पातळीवर 50 टक्‍के अथवा त्याहून अधिक वसुली आहे, अशा संस्था सभासदांना एक लाखांपर्यंत कर्जवाटप करते. परंतु, बॅंकेने ही कर्ज मर्यादा आता वाढवून तीन लाख केली आहे. तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार राष्ट्रीयीकृत बॅंकेप्रमाणेच जिल्हा बॅंकेतर्फेदेखील शेतकऱ्यांना थेट मॉरगेज कर्ज देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या धर्तीवर शाखा स्तरावरच आता थेट कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय यावेळी झाला. याप्रसंगी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे, सरव्यवस्थापक किसन मोटे, बॅंकेचे व्यवस्थापक के. आर. पाटील आदी उपस्थित होते. बॅंकेने रिटेल फायनान्स, पगारदार नोकरदारांना वैयक्‍तिक कर्ज, सोनेतारण कर्ज, लाईव्ह स्टॉक फायनान्स या योजनांअंतर्गत बॅंकेच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याचेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, सर्वांच्या प्रयत्नतूान बॅंक पुन्हा पूर्वपदावर येऊ लागली असून थकबाकी व येणेबाकी वसुलीसाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे, असे आवाहन कोथमिरे यांनी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT