To a dead Corona woman from Madha taluka Someone infected with corona ...? 
सोलापूर

माढा तालुक्‍यातील मृत कोरोना महिलेला कुणामुळे झाली कोरोनाची लागण...?

सकाळ वृत्तसेवा

कुर्डू (जि. सोलापूर) ः लऊळ (ता. माढा) येथील 39 वर्षाच्या व कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेला कोरोना विषाणूची लागण कुणामुळे झाली याची चौकशी गेल्या तीन दिवसांपासून प्रशासन करत आहे. अद्यापही याविषयी योग्य माहिती न समजल्याने ग्रामस्थांमध्ये काहीसा संभ्रम व बरीचशी भीती आहे. तालुक्‍यात कोरोनामुळे मृत महिलेला नेमकी लागण कुठे, कशी झाली याचा तपास लावणे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. 

मृत महिला ही ता. 3 जून रोजी लऊळ येथून पुढील उपचारासाठी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली होती. तेथे एकूण तेरा जणांची ओ.पी.डी.झाली आहे, तर तेथीलच सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या खाजगी दवाखान्यात या महिलेसह सतरा जणांची सोनोग्राफी करण्यात आली आहे. 

टेंभुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात ता. 3 जून रोजी ओ. पी. डी. साठी लऊळ (एक), टेंभुर्णी (सात), मळेगाव (दोन), नगोर्ली (एक), शिराळ (एक), कंदर (एक) येथून रूग्ण आले होते. टेंभुर्णी येथील ज्या खाजगी दवाखान्यात सोनोग्राफी करण्यात आली तेथे टेंभुर्णी (तीन),आलेगाव (दोन), व उपळवाटे,बार्डी, मोडनिंब, बिटरगाव, नगोर्ली, सांगवी, वरवडे, तांबवे, परिते, शेवरे, कुर्डूवाडी, मळेगाव या गावातील प्रत्येकी एकेक पेशंटची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, या बाबात उपविभागीय प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या लऊळ येथील मृत कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीचा तपास करत आहोत. अद्यापही याविषयी विशेष तपशील हाती लागलेला नाही. त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी अफवावर विश्वास ठेऊ नये. प्रशासनाला सहकार्य करावे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज ! केदार शिंदेंच्या मावशीने सुनावले खडेबोल "काही अतिशहाणे.. "

SCROLL FOR NEXT