ITI 
सोलापूर

"आयटीआय'च्या दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत ! 

दिनेश देशमुख

बोंडले (सोलापूर) : आयटीआयसाठी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश अर्जात 30 नोव्हेंबरपूर्वी आवश्‍यक तेथे बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा. 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्‍यक तेथे बदल करून आपला प्रवेश अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर न केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गातून जागा वाटपासाठी ग्राह्य धरण्यात येतील. तसेच दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी 3 डिसेंबर रोजी तीन वाजता जाहीर करण्यात येणार असून, प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने देण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाच्या सामाजिक आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील ऑगस्ट 2020 सत्रातील केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पहिल्या प्रवेश फेरीनंतर तहकूब करण्यात आली होती. या अनुषंगाने नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रवेश प्रक्रियेबाबत 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता आरक्षण न ठेवता या वर्गात अर्ज केलेल्या उमेदवारांचा अर्ज खुल्या प्रवर्गासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असे निर्देश दिलेले आहेत. 

राज्यात शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ऑगस्ट 2020 प्रवेश सत्राची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने 1 ऑगस्ट 2020 पासून राबविण्यात येत आहे. यासाठी निर्धारित वेळापत्रकानुसार 1 ते 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यानुसार उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन 8 सप्टेंबर रोजी प्रथम फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. पहिल्या प्रवेश फेरीतील प्रवेश उमेदवारांनी 9 ते 14 सप्टेंबर या कालावधीत निश्‍चित केले होते. त्यास संचालनालयाने 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती. 

यादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या 9 सप्टेंबर 2020 रोजीच्या निर्णयान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या सामाजिक आरक्षणास स्थगिती देण्यात आली. तथापि, या आदेशाच्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणामध्ये बदल करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने आयटीआयची प्रवेश प्रक्रिया रखडली गेली होती. 

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक 

  • ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज करणे, अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे : 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 
  • दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे : 1 ऑगस्टते 30 नोव्हेंबर 
  • गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : 3 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता 
  • दुसरी प्रवेश फेरी : 4 ते 8 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्‍चित करणे : 12 ते 15 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • चौथ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्‍चित करणे : 19 ते 22 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • नव्याने ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्‍चित करणे : 1 ते 20 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 
  • जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी : 24 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजता 
  • खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश : 31 डिसेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT