marhan 
सोलापूर

नेव्हीतील अधिकाऱ्यावर हालहळ्ळीत प्राणघातक हल्ला; माजी सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल 

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : आईला का घेऊन गेला, अशी विचारणा करणाऱ्या नेव्हीमधील अधिकाऱ्यावर सख्ख्या मामांसह इतर सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून काठी, लोखंडी रॉड व दगडाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना 22 जुलै रोजी हालहळळी अ. (ता. अक्कलकोट) येथे घडली. या घटनेची अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या नेव्हीमधील अधिकारी नागनाथ परमेश्वर हुक्केरी (वय 33) यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. 

नागनाथ हुक्केरी यांच्या आईला भागेश बिराजदार हे घेऊन गेले होते. याची माहिती मिळताच नागनाथ यांनी खंडेशा बिराजदार याला विचारणा केली असता तेथे माजी सरपंच नीलप्पा बिराजदार याने आई, बहीण, मुले व इतरांना जमवून नागनाथ हुक्केरी यांना शिवीगाळ केली व तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत लोखंडी रॉड व दगडाने प्राणघातक हल्ला केला. यात नागनाथ हुक्केरी बेशुद्ध पडले. संशयित आरोपींनी जखमीला उपचारासाठी नेणाऱ्यांनाही बघून घेईन, अशी धमकी दिली. या घटनेत जखमीच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची चैन, एक मोबाईल गहाळ झाला आहे. घटनेनंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्यासह पोलिसांनी दवाखान्यात येऊन जखमीचा जबाब घेतला. 

दुसऱ्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी हालहळ्ळीचे माजी सरपंच नीलप्पा बिराजदार, खंडेशा बिराजदार, भागेश बिराजदार, भौरम्मा बिराजदार, रत्नाबाई बिराजदार, मल्लिनाथ बिराजदार, गुरुनाथ बिराजदार (सर्व रा. हालहळळी अ., ता. अक्कलकोट) यांच्यावर उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT