सोलापूर

सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अचानक रजेवर

तात्या लांडगे


सोलापूर : सोलापुरात दिवसेंदिवस कोरोना या विषाणूचा विळखा वाढत असतानाच वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर सोमवारी (ता. 11) अचानक रजेवर गेले. सलग दोन महिने काम केल्याने थकवा जाणवू लागला असून ताप आल्याने डॉ. ठाकूर यांना काही दिवस रजा मंजूर केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. मात्र वेगळेच असल्याची चर्चा सोलापुरात रंगली
आहे.

सोलापुरात मागील काही दिवसांत कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल तत्काळ घ्यावेत, बऱ्या झालेल्या रुग्णांच्या स्वागताचे जाहीर कार्यक्रम करू नयेत, मुलांवरील उपचाराची माहिती नियमित द्यावी, माझ्याशिवाय कोणालाही कोरोनाबद्दल माहिती देऊ नये, असे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ठाकूर यांना खडसावल्याची चर्चा आहे. एवढे उत्कृष्टपणे काम सुरू असतानाही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला सुनावल्याची खंत मनामध्ये ठेवून डॉ. ठाकूर रजेवर गेल्याचीही चर्चा आहे. मात्र, या बाबींचे खंडन करीत आपल्याला ताप आल्यानेच आपण रजा घेतली आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. डॉ सुब्बलक्ष्मी जयस्वाल यांच्याकडे अधिष्ठाता या पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

मला कोणीच हटवू शकत नाहीत; माझे काम बोलते
माझे प्रमुख (डॉ. तात्याराव लहाने) मुंबईत असून त्यांना माझे काम माहिती आहे. रुग्णसेवा ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे मला अधिष्ठाता या पदावरून कोणी हटवणार नाही असा विश्वास आहे. सलग दोन महिने काम केल्याने कणकण जाणवत होती. थोडासा ताप आल्याने काही दिवस रजा घेतली असून चार पाच दिवसात पुन्हा कामावर येईल. आपल्याला सोलापूर लवकरच कोरोनामुक्त करायचे आहे.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT