सोलापूर

तारेवरचे कपडे काढताना आई कोसळल्यानंतर मुलगा धावला पण...

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वीजेचा धक्का बसून आई आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. वाळत घातलेले कपडे काढायला गेल्यानंतर तारेमध्ये असलेल्या वीजेच्या प्रवाहाने ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 

अजय गणेश गंजी (वय 25), शशिकला गणेश गंजी (वय 45, रा. रविवार पेठ, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. शशिकला गंजी या आज रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरासमोर वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या. ज्या तारेवर कपडे होते, त्या तारेमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने शशिकला या खाली कोसळल्या. आईला वाचवण्यासाठी मुलगा अजय धावून गेला. त्यावेळी त्यालाही विजेचा धक्का बसला. दोघेही बेशुद्ध पडले. दोघांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election : 'ऑपरेशन कमळ'ची भीती की क्रॉस व्होटिंगचं संकट? राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा गेम प्लॅन; चार्टर्ड विमानाने 63 आमदारांना हलवले

Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Navi Mumbai News: डेटा सेंटरमुळे संकट? नवी मुंबईत विरोध, माजी उपमहापौर आक्रमक

IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात ‘अन्न औषध’ विभाग सतर्क; कारवाईच्या भितीने गूळ उत्पादन बंद, मार्केटमध्ये गुळाची आवक घटली

SCROLL FOR NEXT