31Corona_20akola_2001_1_3.jpg 
सोलापूर

वेळेत उपचार घेतल्याने थांबले शहरातील मृत्यू ! आज 21 पुरुष व 10 महिला कोरोना पॉझिटिव्ह 

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील को- मॉर्बिड रुग्णांवर सर्व्हेच्या माध्यमातून दररोज वॉच ठेवला जात आहे. त्यामुळे शहरातील मृत्यूची संख्या पूर्णत: कमी झाली असून संशयितांनी वेळेत उपचार घ्यायला सुरवात केल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. आज शहरात नव्या 31 रुग्णांची भर पडली असून दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 19 हजार 834 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 298 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील 561 रुग्णांचा झाला कोरोनामुळे मृत्यू; को- मॉर्बिड रुग्णांवर दररोज वॉच 
  • आतापर्यंत नऊ हजार 292 रुग्णांनी केली कोरोनावर मात; शहरात आता उरले 445 रुग्ण 
  • बाधितांमध्ये सर्वाधिक सहा हजार 96 पुरुष तर चार हजार 202 महिलांचा समावेश 

शहरात आज न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), सोमवार पेठ, प्रियंका नगर, आत्तार नगर, कोटणीस नगर (विजयपूर रोड), किसान संकुल (अक्‍कलकोट रोड), पश्‍चिम मंगळवार पेठ, विद्या नगर (शेळगी), अभिषेक नगर, विशाल नगर (जुळे सोलापूर), मुरारजी पेठ, भवानी पेठ (शाहीर वस्ती), शिवाजी नगर (बाळे), व्यंकटेश अपार्टमेंट (महिला हॉस्पिटलमागे), मोदीखाना, जमादार वस्ती (नेताजी शाळेसमोर), विष्णू मिल चाळ, देसाई नगर (मजरेवाडी) आणि जेलरोड येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 104 संशयित होम क्‍वारंटाईन असून 65 संशयित इन्स्टिट्यशूनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे 45 संशयितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आज शहरातील 34 रुग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले आहे. नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी विनाकारण जाऊ नये, संशय वाटल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT