Decision Bhima members Two thousand canceled sakal
सोलापूर

सोलापूर : भीमा चे दोन हजार सभासद रद्द

साखर संचालकांचा निर्णय; राजन पाटील गटाला मोठा धक्का

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ: टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे दोन हजार १२८ सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे आदेश सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजकुमार दराडे यांनी दिला आहे. त्यामुळे भीमा कारखान्याच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे. हा निर्णय कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील गटाला जोरदार धक्का असल्याचे मानले जात आहे.

कारखान्याचे सभासद तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण व माजी पंचायत समिती सदस्य अभिजित उर्फ नानासाहेब पवार (रा. अंकोली) यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी या कार्यालयाकडे सभासदत्व रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जात सदर सभासदांची कारखाना कार्यक्षेत्रात दहा गुंठेपेक्षा कमी जमीन असणे, भाग भांडवलाची रक्कम अपूर्ण असणे यासह अनेक प्रमुख मुद्यावर २ हजार ४५१ जणांचे सभासदत्व रद्द करावे, यासाठी हरकती दाखल केल्या होत्या. या प्रकरणाची सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे ९ सप्टेंबर २०२१ पासून किमान सहा वेळा सुनावणी घेण्यात आली. मात्र ज्यांच्याविषयी हरकत घेण्यात आली. त्यांनी कोणत्याही प्रकारचा समाधानकारक खुलासा केला नाही. तसेच वारंवार संधी देऊनही हरकतीच्या मुद्‌द्‌यांची पूर्तता करू शकले नाहीत. त्यामुळे सुनील चव्हाण व अभिजित पवार यांचे म्हणणे ग्राह्य धरून हा निकाल देण्यात आला.

दरम्यान, भीमा कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निकालाचा परिणाम म्हणून विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या माजी आमदार राजन पाटील यांच्या गटाला धक्का बसला आहे. दरम्यान, यातील पात्र असलेल्या ३२३ सभासदांपैकी ११० जणांची शेअर्सची रक्कम अपुरी आहे, यासह अन्य कारणामुळे त्यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे.

गेल्या दहा वर्षापासून मी कुठल्याही सभासदावर अन्याय होऊ दिला नाही आणि कारखान्याच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवले नाही. आगामी काळातही सभासदावर अन्याय केला जाणार नाही. ज्यांचे सभासदत्व रद्द झाले आहे, त्यांचाही ऊस कारखाना गाळपास नेणार आहे.

- धनंजय महाडिक, अध्यक्ष, भीमा साखर कारखाना, टाकळी सिकंदर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Dhananjay Mahadik : भीमा कारखान्याची बिले, कामगारांचे पगार आधी द्या; मगच गोकुळवर बोला; सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

सामूहिक अत्याचार प्रकरणातील पीडितेवर हल्ला, मध्यरात्री घरातून बाहेर ओढत नेत छतावरून फेकलं खाली

Mumbai Indians Playing XI IPL 2027 : अर्शदीप सिंग- जसप्रीत बुमराह... दो भाई, दोनो तबाही; रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील MI ची तगडी प्लेइंग इलेव्हन बघाच...

Latest Marathi News Live Update : परळी रेल्वे स्थानकावरून ७८ वर्षीय वृद्ध बेपत्ता अपहरणाचा गुन्हा दाखल

Leopard Captured: डहाणू तालुक्यात बिबट्याची दहशत: चिंचणीमध्ये बिबट्या अखेर पिंजऱ्यात बंदिस्त; नागरिकांचा सुटकेचा निश्वास.

SCROLL FOR NEXT