Train 
सोलापूर

विद्यार्थी, व्यापारी, चाकरमान्यांची वाढली चिंता; कारण चेन्नई एक्‍स्प्रेसला रेल्वेचा "रेड सिग्नल'! 

प्रमोद बोडके

सोलापूर : गेल्या चार दशकांपासून कुर्डुवाडी-सोलापूर यादरम्यान प्रवास करण्यासाठी चाकरमानी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्यांच्या हक्काची असलेल्या मेल एक्‍स्प्रेसला रेल्वे विभागाने रेड सिग्नल दाखविला आहे. सकाळी 7.30 ला कुर्डुवाडीतून मुंबई-चेन्नई मेल ही हक्काची गाडी. परत गावाकडे जाण्यासाठी सोलापुरातून सायंकाळी 6.15 ला असलेली ही गाडी पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसह दौंड, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ परिसरातील प्रवाशांची लाईफलाइन झाली होती. रेल्वेने गाड्यांच्या वेळापत्रकातून आता चेन्नई-मुंबई मेल ही रेल्वे कायमस्वरूपी बंद केल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. 

सुरवातीला फेब्रुवारीत, नंतर जूनमध्ये जाहीर झालेल्या रेल्वेच्या वेळापत्रकातून चेन्नई-मुंबई गाडीला वगळले आहे. करमाळा, माढा, मोहोळ या भागातून दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणारे चाकरमानी, महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यापारी यांच्यासाठी विजयपूर गाडी दररोज सोडण्याची मागणी व कोणार्क गाडीला थांबा देण्याची मागणी सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे यांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

कोल्हापूर - सोलापूर या गाडीनंतर आता सोलापूरकडे जाण्यासाठी मेल एक्‍स्प्रेस ही दैनंदिन गाडी होती. चेन्नई मेल ही गाडी रद्द झाल्याने दौंडपासून कुर्डुवाडीपर्यंत विजयपूर पॅसेंजरवर ताण येण्याची शक्‍यता आहे. यामध्ये विजयपूर रेल्वे आठवड्यातून चारच दिवस असल्याने इतर नियमित अप-डाउन करणाऱ्यांना आता त्या दिवशी पहाटे सहाच्या गाडीशिवाय दुसरा पर्याय नाही. भुवनेश्वर-मुंबई ही कोणार्क गाडी नव्या वेळेस 6.15 वाजता सोलापूरहून निघणार आहे. त्यामुळे कोणार्क गाडीचे थांबे वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

याबाबत सोलापूर जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्षद मोरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील हजारो रेल्वे प्रवाशांची सोय व्हावी यासाठी विजयपूर रेल्वे पूर्ण आठवडाभर सुरू करावी. या गाडीला केम, माढा, मोहोळ या ठिकाणी थांबा द्यावा. भुवनेश्वर ते मुंबई या कोणार्क एक्‍स्प्रेसला मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, केम, जेऊर या ठिकाणी थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रबंधक यांच्याकडे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास हजारो प्रवासी तीव्र आंदोलन करतील. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT