The decision to honor Akkalkot Dr. Sharankumar Limbale with the Saraswati Award has been announced.jpg 
सोलापूर

साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळेंच्या 'सनातन'ला सरस्वती पुरस्कार

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : ख्यातनाम साहित्यिक हन्नुर (ता.अक्कलकोटचे) सुपुत्र डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना सन २०२० चा के. के. बिर्ला फाऊंडेशनने सरस्वती पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांनी हर्ष व्यक्त केला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला. 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या 22 भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म 1 जून 1956 रोजी सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर या गावी झाला. डॉ. शरणकुमार लिंबाळे हे प्रख्यात आणि मान्यवर मराठी कादंबरीकार आहेत. 

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून मराठी भाषेत एम.ए. केल्यावर त्यांनी तुलनात्मक अभ्यासावरून येथून मराठी दलित साहित्यावर पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली आहे. डॉ. लिंबाळे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक येथे प्राध्यापक आणि संचालक या पदावरून निवृत्त झाले. महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक येथील प्रकाशन विभागातील सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत होते. दरवर्षी हा पुरस्कार भारतीय नागरिकाला अशा उत्कृष्ट कलाकृतीसाठी देण्यात येतो जो भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित नमूद केलेल्या कोणत्याही भारतीय भाषेमध्ये सन्मानाच्या वर्षाच्या दहा वर्षांच्या कालावधीत प्रकाशित केला जातो.  या सन्मानार्थ पंधरा लाख रुपयांच्या बक्षीस रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केले जाते.

हन्नुर सारख्या खेडेगावात माझा जन्म झाला. मी तिथल्या बसस्थानकावर मोठा झालो तसेच चपळगाव येथील शाळेत मी शिक्षण घेतले. त्यामुळे तिथल्या मातीने मला घडविले आणि मला खूप प्रेम मिळाल्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो. माणूस कुठे जन्मला हे महत्वाचे नसून तो कसा जगला याला जास्त महत्व आहे. मला परिस्थितीने लिहिण्याचे बळ दिले आणि त्यातून प्रेरणा मिळाली. हा पुरस्कार गौरव म्हणजे माझं हन्नुर गाव, अक्कलकोट तालुका तसेच जिल्हयाचा गौरव आहे. त्याने मला खूप आनंद झाला. 

- शरणकुमार लिंबाळे, सन्मानार्थी लेखक

माझ्या हन्नुर गावचे सुपुत्र लेखक शरणकुमार लिंबाळे यांना बिर्ला फाऊंडेशनतर्फे 'सरस्वती सन्मान'ने राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ महाराज तीर्थक्षेत्राची नवी ओळख आज अक्कलकोटच्या सुपुत्रानी बनवली आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. खरतर सरांसोबत हन्नुर गावचा आणि संपूर्ण अक्कलकोट तालुक्याचा गौरव होत असल्याचा आनंद आहे. 

- आ. सचिन कल्याणशेट्टी, अक्कलकोट 

शरणकुमार लिंबाळे हे दलित साहित्याच्या दुसऱ्या पिढीतील साहित्यिक असून त्यांनी आत्मकथन, कविता, समीक्षा या प्रकारातून विपूल लेखन केले आहे. विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला केंद्र मानून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता व अन्याय विरुद्ध लढा देण्याची वृत्ती त्यांच्या विचारातून दिसून येते.

 - प्रा.डॉ शंकर धडके, खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT