Dedicated Covid Hospital at six places in Pandharpur city 
सोलापूर

पंढरपूर शहरात सहा ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर शहरातील सहा हॉस्पिटल अधिग्रहीत करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. या पैकी उपजिल्हा रुग्णालयासह सहा हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असून त्यांची बेडची संख्या 180 आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विठ्ठल हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर विकसित करण्यात आले आहे. 
पंढरपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरु केल्या आहेत. यामध्ये संपर्क शोधणे, तपासणी व उपचार करणे तसेच संस्थात्मक विलगीकरण करणे यावर भर देण्यात येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची व्यापक प्रमाणात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहेत, असेही श्री. ढोले यांनी सांगितले. 
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील लाईफलाईन, गॅलॅक्‍सी, गणपती, जनकल्याण, ऍपेक्‍स व उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल तसेच विठ्ठल हॉस्पिटल डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर हॉस्पिटल म्हणून सुरु करण्यात आली आहेत. तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी रोहन व निष्कर्ष पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातूनही तपासणी करण्यात येणार आहे. या दोन्ही खाजगी लॅबना तपासणीसाठी परवानगी मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याचेही श्री. ढोले यांनी सांगितले. 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ डॉक्‍टरांचे पथक तयार करण्यात आले असून या पथकामार्फत नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मेडीकल असोशिएनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या मार्फत गंभीर रुग्णांना उपयुक्त ठरणारी इंजेक्‍शनची उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यासह तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. संचारबंदीच्या कालावधीत नारिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी, जेणेकरुन बाधितांचे वेळेत निदान करणे शक्‍य होईल, असे आवाहनही श्री. ढोले यांनी केले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update: पवईत आढळले दोन अजगर, रेस्क्यू टीम घटनास्थळी

SCROLL FOR NEXT