dipak salunkhe photo 
सोलापूर

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील 

प्रमोद बोडके

सोलापूर : माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या बाबतचे नियुक्ती पत्र साळुंखे यांना आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात देण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत महाआघाडीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करणारे माजी आमदार साळुंखे कोणत्या पक्षात आहेत अशी विचारणा करणाऱ्यांना आज या निवडीने उत्तर मिळाले आहे. 
हेही वाचा - जालीहाळमध्ये घोळात घोळ 
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कोशाध्यक्ष हेमंत टकले, राष्ट्रवादी मासिकाचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे यांच्या उपस्थितीत हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. साळुंखे-पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला प्रदेश राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-शेकाप-कॉंग्रेसची आघाडी असताना माजी आमदार साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने सांगोल्यातून उमेदवार जाहीर केली होती. साळुंखे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही उमेदवारी रद्द केल्याचे जाहीर केले होते. या निवडणुकीसाठी सांगोल्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांना असल्याचे जाहीर केले होते. साळुंखे-पाटील यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT