सोलापूर

माशांची मागणी वाढली पण आवक कमी; भिगवण बाजारात भाव वाढले 

राजाराम माने

केतूर (सोलापूर) ः शारदीय नवरात्रउत्सवानंतर मासे खवय्याकडून माशांना मागणी वाढली आहे. परंतु, मासे बाजारात माशांची आवक कमी होत असल्याने व मागणी जास्त झाल्याने माशांचे दर मात्र रोजच वाढत आहेत. भाजीपाल्याचे दरही शंभर रुपये किलोच्या पुढे जाऊन पोचल्याने आता भाजी करायची तरी काय? हाच प्रश्‍न गृहिणींना सतावत आहे. 

उजनीच्या गोड्या पाण्यातील माशांना राज्याबरोबरच परराज्यांतूनही थंडीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक अत्यल्प होत असल्याने माशांचे दर वाढतच चालल्याने मासे खवय्यांच्या खिशाला "चाट' बसत आहे. 
उजनी जलाशयात प्रामुख्याने चिलापी जातीचा मासा मोठ्या प्रमाणावर सापडतो. परंतु, जलसंपदा विभागाने जलाशयांमध्ये कोणत्याही प्रकारची मत्स्यबीज गेल्या अनेक वर्षापासून न सोडल्याने जलाशयात माशांची संख्या कमी झाली आहे. परिणामी मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांना अथांग भरलेल्या उजनी जलाशयांमध्ये मासे अत्यल्प प्रमाणात सापडत आहेत. अंडी सात रूपये एक याप्रमाणे विकले जात आहे. चिकन 200 रुपये किलो व बोकडाचे मटण 520 रुपये किलो दराने विकले जात आहे. एकूणच सध्यातरी मांसाहार करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे हेच खरे. 


संपादन ः संतोष सिरसट  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT