मांसाहारींसाठी खूषखबर! हिवाळ्यात माशांना वाढली मागणी, दर मात्र स्थिरच
मांसाहारींसाठी खूषखबर! हिवाळ्यात माशांना वाढली मागणी, दर मात्र स्थिरच Sakal
सोलापूर

मांसाहारींसाठी खूषखबर! माशांना वाढली मागणी, दर मात्र स्थिरच

राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

थंडीची चाहूल लागल्याने मटण, मासे तसेच चिकनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.

केत्तूर (सोलापूर) : दिवाळी (Diwali) सणाचे गोडधोड खाऊन कंटाळलेल्या नागरिकांची पावले आता झणझणीत, तरतरीत, चमचमीत व ठसकेबाज व ताजे मासे (Fish) खाण्यासाठी उजनीकाठच्या (Ujani Dam) भिगवण (Bhigwan), पळसदेव (Palasdev), इंदापूर (Indapur) भागाबरोबरच उजनी लाभक्षेत्राकडे वळू लागली आहेत. तसेच थंडीची चाहूल लागल्याने मटण, मासे तसेच चिकनच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यातच थंडीमुळे माशांची आवकही कमी होत असली तरी खवय्यांच्या मागणीत वाढ झाली असल्याने मांसाहारींचा माशांकडे ओढा वाढला आहे. माशांचे दर कमी आणि पुरवठाही कमी असल्याने मच्छिमार मात्र संकटात सापडले आहेत, तर पुरवठा सुरळीत असल्याने चिकन, अंडी तसेच मटणाचे दर मात्र स्थिर आहेत.

उजनी जलाशयाच्या गोड्या पाण्यातील माशांना राज्यात सर्वत्रच मोठी मागणी असते. त्यातच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने व पाण्याचा पसारा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मच्छिमारांना मासे सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जलसंपदा खात्याने उजनी जलाशय ताब्यात घेतले असले तरी जलाशयात मत्स्यबीज सोडत नसल्याने वरचेवर माशांचे प्रमाण कमी होत आहे. कोराना प्रादुर्भावाच्या काळापासून भिगवण, इंदापूर मच्छी मार्केटमध्ये लिलावात माशांना कमी दर मिळत आहे. दिवाळीसाठी शहरातून बाहेर गावातून परिसरातील गावागावात आलेली पाहुणे मंडळी, मित्रपरिवार तसेच साखर कारखाने चालू झाल्यामुळे ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. यामुळे स्थानिक बाजारात मात्र जास्त दराने माशाची विक्री होत आहे. यामुळे मच्छिमार मासळी मार्केटमध्ये जाण्यापेक्षा हातविक्री करण्यावर भर देत आहेत.

उजनी जलाशयात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असूनही मासे सापडण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प झाले आहे. त्यातच इतर व मूळ गावरान जातीच्या माशांपेक्षा चिलापी, सकर, मांगूर जातीचेच मासे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. बाम, मरळ, गुगळी, काणस, शिंगटा, चांभारी, ताबऱ्या, शेंगळ, सुंबऱ्या आदी जातींच्या माशांची संख्या अतिशय कमी झालेली आहे. त्यामुळे बाजारात केवळ चिलापी जातीच्या माशांचीच उलाढाल अधिक प्रमाणात आहे.

मासळी लिलाव काट्यावरील मासळीचे दर पुढीलप्रमाणे

चिलापी लहान : 40 ते 130, रोहू : 150 ते 200, कटला : 150 ते 200, वाम : 400, मरळ : 350 ते 400, गुगळी : 250 ते 300, पंकज : 80 ते 100, कोळंबी : 350 ते 400, शिंगटा : 150 ते 200, रूपचंद : 90 ते 120, खेकडे 100 या दराने विकले जात असल्याचे संजय फिश मार्केटचे चेअरमन संजय दरदरे, संदीप मल्लाव यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून उजनी जलाशयाच्या अथांग पाण्यामध्ये सापडणाऱ्या माशांच्या विविध जाती वरचेवर दुर्मिळ व नष्ट होत आहेत. या सर्व जातींचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

- कल्याणराव साळुंके, पर्यावरण व पक्षीप्रेमी, कुंभेज

नेहमीप्रमाणे दिवाळी सणामध्ये माशांना मागणी वाढते; परंतु दिवसभर पाण्यात राहूनही म्हणावे त्या प्रमाणात मासेच सापडत नसल्याने व्यवसाय करणे अवघड झाले आहे.

- सोमनाथ कनिचे, मच्छिमार, केत्तूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT