Nonvege 
सोलापूर

"हे' ग्रामस्थ म्हणतात, यंदा आखाड पार्टी नव्हे आषाढ संडे! चिकन, मटनपेक्षा "याला' आहे मागणी 

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : आषाढातील शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर श्रावण महिन्याला सुरवात होत आहे. श्रावण महिन्यात शुद्ध शाकाहार पाळणाऱ्यांसाठी आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस रविवारी (ता. 19) आल्याने मांसाहारी "आषाढ संडे' साजरा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मटन, मासे, अंडी व चिकनला मोठी मागणी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार म्हणजे आखाड पार्टीचा दिवस! मात्र तो या वर्षी "आषाढ संडे' म्हणूनच साजरा होणार आहे. सोमवारी अमावास्या आहे व मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखला आहे. बोकडाच्या मटनापेक्षा नागरिकांची मासे खाण्यालाच पसंती राहणार आहे. सध्या बोकडाच्या मटनाचे दर 600 ते 650 रुपये किलो, चिकनचा दर 200 ते 220 रुपये किलो तर माशांचे दर 80 ते 100 रुपये किलो असे आहेत. यावर्षी पावसाने वेळेवर सलामी दिल्याने बळिराजा समाधानी व खुशीत आहे. अशा परिस्थितीत गावरान कोंबड्यांना मागणी वाढली आहे; परंतु गावरान कोंबडा 500 ते 550 रुपये तर गावरान कोंबडी 350 ते 400 रुपये दराने विकली जात असल्याने हे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेरच आहेत. 

आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र उत्सव यामुळे बहुतांश नागरिक या काळामध्ये मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे रविवारी आखाड साजरा करण्यासाठी हॉटेल, ढाबे यांना पसंती दिली जाते. तर ग्रामीण भागात एकत्रित येऊन बाहेर आखाड साजरा करण्याची परंपरा आहे. परंतु या वर्षी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व जमावबंदी यामुळे या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांना मात्र "ब्रेक' बसला आहे. त्यामुळे आखाड पार्टी घरच्या घरी व कुटुंबीयांसमवेत साजरी करण्याची वेळ मात्र आली आहे. येथे मात्र काही जणांवर काही बंधने येणार आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT