Mask 
सोलापूर

बापरे..! "कोरोना'च्या दहशतीने वाढली "एन 95'ची 30 पटींनी मागणी!

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : अश्‍विनी रुग्णालयात "कोरोना'सदृश आजाराचा रुग्ण आढळल्याची बातमी गुरुवारी (ता. 5) वाऱ्यासारखी पसरली. मात्र, त्या रुग्णाच्या आजाराचा चीनच्या कोरोनाशी संबंध नसल्याचा खुलासा रुग्णालय प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांना करावा लागला. तरीही कोरोनाची धास्ती घेतलेल्या नागरिकांनी मेडिकल दुकानांमध्ये "एन 95' मास्कसाठी गर्दी करायला सुरवात केली आहे. इतरवेळी दरमहा 500 मास्कची मागणी होणाऱ्या एका मेडिकलमध्ये दोन दिवसांत एक हजारावर मास्कची मागणी झाली. मात्र दुकानांमध्ये मास्क शिल्लक नसल्याने नागरिक हवालदिल होत आहेत.

"कोरोना'बाबत उपाययोजनेसाठी वाढली मास्कची मागणी
चीनमध्ये कोरोनाने घातलेला धुमाकूळ व हजारोंच्या मृत्यूमुळे जगभरात याबाबत चिंता केली जात आहे व त्याचबरोबर उपाययोजनाही सुरू आहेत. भारतातही कोरोनाने शिरकाव केल्याने शासनही युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे. कोरोनावर कुठलेच औषध सध्या तरी उपलब्ध नसल्यामुळे त्याची लागण होऊ नये, हाच सध्या यावर उपाय आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे मेडिकलमध्ये एन 95 मास्कसह हॅंड सॅनिटरायझरची मागणीही वाढत आहे. काही वर्षांपूर्वी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून सोलापुरातील मेडिकल दुकानांमध्ये एन 95 मास्कची मागणी वाढली होती. थंडीच्या दिवसांत याची मागणी असते. रुग्णालयांमधूनही मागणी असते. दरमहा 400 ते 500 मास्कची मागणी असते. मात्र गुरुवारी कोरोनाचा रुग्ण आढळल्याच्या बातमीमुळे नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे. मात्र उत्पादन व पुरवठाच नसल्याने मास्क मिळणे कठीण झाले आहे.

एन 95 मास्कचे वैशिष्ट्य
डिस्पोजेबल एन 95 मास्क एक सुरक्षा साधन आहे, जे नाक आणि तोंड झाकून ठेवते आणि धारण करणाऱ्यास काही घातक पदार्थांमध्ये श्‍वास घेण्यापासून वाचवते. हा मास्क चांगला एअर फिल्टर असल्यामुळे हवेतील धूळ घातक विषारी वायूंपासून वाचवतो.

स्वाईन फ्लूपासून एन 95 मास्कची मागणी होत आहे. इतरवेळी महिन्यातून 500 मास्कची विक्री होत होती, मात्र काल सोलापुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याच्या बातमीमुळे कालपासून एक हजार मास्कची मागणी झाली. मात्र आता स्टॉक संपला आहे. डिस्ट्रिब्यूटरकडेही स्टॉक नाही.
- यासीर शेख,
मेडिकल चालक

कालपासून अचानक एन 95 मास्कची मागणी वाढली आहे. मात्र जो स्टॉक होता तो आता संपला आहे. काही मेडिकलमध्ये जो स्टॉक होता त्याची विक्रीही झाली आहे. सोलापुरात कुठल्याही डिस्ट्रिब्यूटरकडे मास्क उपलब्ध नाही. पुणे, मुंबई येथून येणारा मास्क तेथेही कच्चा माल नसल्यामुळे उत्पादन बंद आहे.
- श्रीधर वडनाल,
डिस्ट्रिब्यूटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT