democratic Youth Federation protest against govt decision contracting government posts govt school adoption scheme  Sakal
सोलापूर

Solapur : लोकशाहीवादी युवा महासंघाचे आंदोलन; कंत्राटीकरणाच्या शासन निर्णयाची होळी

शासकीय पदांचे कंत्राटीकरण व शासकीय शाळा दत्तक योजनेच्या शासन निर्णयांची येथील लोकशाहीवादी युवा महासंघच्या वतीने होळी करून निषेध

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शासकीय पदांचे कंत्राटीकरण व शासकीय शाळा दत्तक योजनेच्या शासन निर्णयांची येथील लोकशाहीवादी युवा महासंघच्या वतीने होळी करून निषेध करण्यात आला. आज जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर हे आंदोलन युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आले.

राज्य शासनाने सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा निर्णय घेऊन कायमस्वरूपी रोजगार संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. सरकारी नोकरी करू पाहणाऱ्या युवकांचे स्वप्न धुळीस मिळवत आहे. संविधानाने दिलेले आरक्षण पूर्णपणे ठप्प करू पाहत आहे. शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी ही दत्तक योजनेतून महाराष्ट्रातील ६२ हजार जिल्हा परिषदेच्या शाळा कंत्राटदारांच्या घशात घालून होणारे खासगीकरण थांबवावे. इस्पितळातील मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना बडतर्फ करावे.

या सरकारी भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) याद्वारे राबवावा. आरक्षित जागा भरतीची काटेकोर अंमलबजावणी करावी. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज केंद्र सुरू करावे. सार्वजनिक इस्पितळातील मृत्यू प्रकरणी चौकशी समिती स्थापन करावी. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गोदूताई परुळेकर नगरमधून होणारी जडवाहतूक बंद करावी अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी अशोक बल्ला रफिक काझी बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ, अप्पाशा चांगले, नरेश गुल्लापल्ली, सन्नी कोंडा, दिनेश बडगु, राहुल बुगले, राकेश म्हेत्रे, संतोष बोडा, जैद मुल्लामजहर आगवाले, श्रीकांत बोगम, अजय बोड्डू, अनिल काडगी, चंद्रकांत धोत्रे, जावेद पठाण, गोविंद सज्जन, अप्पाशा निकंबे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT