hUKUM mULANI mANGLVEDHA.jpeg 
सोलापूर

कमी खर्चात घर बांधण्यासाठी मंगळवेढ्यात साकारले डेमो हाऊस 

हुकुम मुलाणी

मंगळवेढा : ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना कमी खर्चात घरकुलाचे बांधकाम कसे करावे, याचे प्रात्यक्षिक लोकांना कळावे म्हणून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारामध्ये दाखवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डेमो हाऊसचे उद्‌घाटन सभापती प्रेरणा मासाळ यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी माजी सभापती प्रदीप खांडेकर, गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सुधाकर मासाळ, शांताप्पा बिराजदार, विठ्ठल सरगर, सचिन चव्हाण, शाखा अभियंता नागनाथ गोष्टी यांच्यासह वरिष्ठ सहाय्यक सचिन येडसे, डाटा एंट्री ऑपरेटर युवराज सूर्यवंशी, गृहनिर्माण विभागाचे अभियंता अनिल गरंडे, विनायक डांगे, शिवाजी हेंबाडे, संतोष सोनवले, शांतीलाल सावंत आदीसह जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कर्मचारी उपस्थित होते. 

या आर्थिक वर्षामध्ये मंगळवेढा पंचायत समितीला 3500 घरकुलाचे बुद्धिष्ट प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देण्यात आले असून त्यामध्ये 1900 घरकुलाचे करारनामे पूर्ण झालेले आहेत. लाभार्थ्यांनी केलेल्या बांधकामाच्या प्रमाणानुसार पहिल्या व दुसऱ्या अनुदानाचे वाटप थेट त्यांच्या बॅंक खात्यावर करण्यात आले. सध्याच्या काळात अनुदान यापेक्षा घरकुलाचे बांधकाम अधिक खर्चिक होत असल्यामुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये चिंता असल्यामुळे कमी खर्चात बांधकाम कसे निर्माण करावे, याचे प्रात्यक्षिक या बांधकाम विभागाच्या आवारात दाखवण्यात येणार आहे. जेणेकरुन त्याचा लाभ ग्रामीण भागातील नव्याने बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना होणार आहे. 

घरकुलाच्या अनुदानात बरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास 21 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्याला देण्यात येणार आहे. त्यासाठी जॉब कार्ड धारक मजुरांनी कामाची मागणी करावी, अशी आवाहन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रशांत ढगे यांनी केले. ज्या घरकुल लाभार्थ्याचे अद्याप करारनामे झाले नाहीत. त्यांनी तात्काळ करारनामे करून घ्यावेत, असे आवाहन सभापती प्रेरणा मासाळ यांनी केले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT