सोलापूर

कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिकामुळे सोयाबीन उत्पादनात भरघोस वाढ 

संतोष सिरसट

सोलापूर ः येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तेलबिया समूह आद्य रेखा प्रात्यक्षिकामुळे सोयाबीन उत्पादनामध्ये भरघोस वाढ झाल्याचे मत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प सोलापूरचे डॉ. व्ही. एम. अमृतसागर यांनी व्यक्त केले. 
कृषी विज्ञान केंद्र सोलापूरमार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ढोराळे (ता. बार्शी) येथे समूह प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात डॉ. अमृतसागर बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री राऊत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अमोल शास्त्री यांनी केले. ढोराळे गावामध्ये राबविण्यात आलेले सोयाबीनचे सुधारित वाण एमएयुएस-162 व एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन याविषयी शास्त्री यांनी सविस्तर माहिती दिली. 
तालुका कृषी अधिकारी श्री राऊत यांनी गट संघटन, स्मार्ट प्रकल्प तसेच "विकेल ते पिकेल' या शासनाच्या योजनेविषयी माहिती दिली. 
डॉ. अमृतसागर यांनी प्रात्यक्षिक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राबविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना सुधारित वाण व एकात्मिक खत व कीड व्यवस्थापनाचा चांगला फायदा दिसून येत असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी सुधारित वाण केडीएस-726 (फुले संगम), एमएयुएस-612, एमएयुएस-162 या वाणांचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

यावेळी प्रात्यक्षिकाचे लाभार्थी विष्णू चोरमले, अमोल काकडे, रमेश सातपुते यांनी आपले अनुभव व्यक्त केले. डॉ. तांबडे यांनी ढोराळे गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कटिबद्ध असल्याचे सांगितले. सोयाबीनच्या प्रात्यक्षिकामुळे प्रति एकर उत्पादनांमध्ये भरघोस वाढ झाल्याचे सांगितले. सोयाबीनमध्ये रायझोबियम जिवाणूसंवर्धक बीजप्रक्रिया, गंधकाचा वापर व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांचा वापर याबरोबरच सुधारित वाण याच्या वापराने चांगले उत्पन्न वाढीची संधी असल्याचे नमूद करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सोयाबीनच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रला भेट देऊन त्याची पाहणी केली. कृषी दिन कार्यक्रमाकरिता ढोराळे, सुर्डी, पिंपरी येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. समाधान जवळगे यांनी सूत्रसंचालन केले. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT