Dental Sakal
सोलापूर

Dental Operation Equipment : दंतवैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी संशोधित उपकरणांची निर्मिती, प्रा. डॉ. कुलकर्णी यांची कामगिरी

Prof. Dr. Kulkarni : विज्ञानातील मूलभूत संकल्पनेवर त्यांनी केलेल्या तीन लेखनाचे कॉपीराइट झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

Dental - वैद्यकीय क्षेत्रात अनेक प्रकारचे संशोधन व निर्मिती करणाऱ्या प्रा. डॉ. अभय कुलकर्णी यांनी दंतवैद्यकीय शस्त्रक्रियांसाठी तीन नवीन संशोधित उपकरणाची निर्मिती करत या क्षेत्राला वेगळे योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे संशोधन उद्यमने नोंदवून त्यावर इनक्युबेशन प्रक्रिया सुरु केली आहे.

येथील पं. दिनदयाळ उपाध्याय दंतवैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून प्रा. डॉ. अभय कुलकर्णी हे कार्यरत आहेत. ज्ञानजिज्ञासा व संशोधन ही त्यांची ओळख बनली आहे. त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय सेवेला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

त्यासोबत त्यांचे संशोधन देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विज्ञानातील मूलभूत संकल्पनेवर त्यांनी केलेल्या तीन लेखनाचे कॉपीराइट झाले आहे. चीन नंतर या प्रकारचे कॉपीराइट करणारे ते एकमेव सोलापूरकर आहेत. नंतर त्यांची काही पुस्तके देखील लिहिली. या शिवाय त्यांनी तंबाखू मुक्ती जनजागरणात कार्य केले. ग्रामीण भागातील वैद्यकीय संशोधनावर त्यांचा अभ्यास आहे.

त्यानंतर ते सध्या दंतवैद्यकीय क्षेत्रात पीएच.डी.वर काम सुरु करत आहेत. त्यांनी दंतवैद्यकीय क्षेत्रात शस्त्रक्रिया व इतर कामासाठी लागणाऱ्या उपकरणावर संशोधन सुरु केले. ही उपकरणे वैद्यकीय व्यवसायिकांच्यासाठी अधिक उपयुक्त ठरतील अशी काही संशोधन त्यांनी केले.

त्यातून काही उपकरणाची निर्मितीबद्दल त्यांनी पुणे व मुंबईतील तज्ञांनी त्याला पाठबळ दिले. त्यानंतर त्यांनी या उपकरणाचे संशोधन पेटंट करण्यासाठी नोंदणी केली. या कालावधी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या उद्यमशी संवाद साधला. तेव्हा उद्यमने, त्यांची संकल्पना इनक्युबेट करून त्यावर प्रक्रिया सुरु केली आहे.

स्टार्टअपसाठी विकसित केलेली मूल्ये

- पदव्युत्तर शिक्षण घेत असताना संशोधन.

- केलेल्या संशोधनाला पेटंटचे संरक्षण.

- पेटंट कालावधीत इनक्युबेशन प्रक्रिया सुरु.

काही ठळक बाबी

- वयाच्या ४९ व्या वर्षी पीएच.डी पदवी पूर्ण करणे सुरु.

- तीन पुस्तकांचे लेखन.

- लवकरच संशोधित उपकरणांची निर्मिती

- चार भाषात दंत वैद्यक शास्त्राचे पुस्तक लेखन पूर्ण

पेटंट मंजुरीनंतर संशोधित उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. तसेच या उपकरणांचा उपयोग अधिकाधिक दंत वैद्यकांना होण्याच्या दृष्टीने हे संशोधन उपयुक्त ठरणार आहे.

प्रा. डॉ. अभय कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक, पं.दिनदयाल उपाध्याय दंतवैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT