Ajit Pawar 
सोलापूर

यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनाबरोबरच आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी सामाजिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर आवश्‍यक आहे. यापुढे लॉकडाउनचे नाव काढू नका, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले. 

कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सपत्निक महापूजा पार पडली. महापूजेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, गेल्या आठ - नऊ महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या बारा बलुतेदारांची अवस्था फार बिकट झाली आहे. दररोज काम केले तरच त्यांचा प्रपंच आणि घरदार चालते. त्यामुळे सततच्या लॉकडाउनचा फटका सर्वसामान्य आणि गरीब लोकांना बसतो. तरीही केंद्र आणि राज्य सरकारने ज्या - ज्या वेळी लॉकडाउन घोषित केले तेव्हा हा आदेश सर्वांनी पाळला आहे. 

तुम्ही आषाढीची पूजा कधी करणार? असे विचारले असता, श्री. पवार यांनी, आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, असे सांगत, पांडुरंगाने जे दिलंय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे, असे उत्तर त्यांनी दिले. 

वारकरी संप्रदाय समंजस असून काही मंडळींनी वेगळी भूमिका घेतली होती, तरीही त्यांच्या भूमिकेस राज्यातील वारकऱ्यांनी पाठिंबा दिला नाही. कोरोनामुळे केंद्र व राज्यात कर जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत नसेल तर कारवाई करावी लागेल, असा इशाराही अजित पवारांनी या वेळी दिला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना काँग्रेस, ना भाजप! 2 अपवाद सोडले तर महाराष्ट्रात पोटनिवडणूक बिनविरोधची परंपराच नाही!

केरळमध्ये अनंत अंबांनींकडून २ मंदिरांना १८ कोटींचा निधी, हत्तींच्या संवर्धनालाही लावणार हातभार

School Verification Kolhapur : परीक्षेच्या काळात होणार शाळांची पटपडताळणी, शिक्षकांची उडणार तारांबळ

Latest Marathi News Live Update : पुण्यात भयंकर प्रकार! वारजेमध्ये वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न

Air India Fare Hike: इंधन संकटामुळे एअर इंडियाच्या विमान भाड्यात वाढ, आंतरराष्ट्रीय तिकिटांवर अधिक परिणाम

SCROLL FOR NEXT