18683780_RxU2aUhrUZufOUzFHIueFJGHxiX2gol63uy2gNs1YmQ - Copy.jpg 
सोलापूर

ब्रेकिंग! 'पनवेल'चे उपायुक्‍त लेंगरेकर यांची सोलापूर महापालिकेत बदली 

तात्या लांडगे

सोलापूर : लोकाभिमुख, सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची तत्काळ दखल घेऊन त्यावर तोडगा काढणारे उपायुक्‍त म्हणून ख्याती असलेले पनवले महापालिकेचे उपायुक्‍त जमीर लेंगरेकर यांची सोलापूर महापालिकेत तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यासंदर्भात बुधवारी (ता. 12) आदेश निघाले आहेत. तत्पूर्वी, गणेश देशमुख यांची बदली करुन त्यांच्याजागी पनवेल महापालिकेच्या आयुक्‍तपदी सुधाकर देशमुख यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. प्रशांत रसाळ यांचीही बदली करण्यात आली होती. 

सोलापूर महापालिकेत दोन उपायुक्‍त पदे रिक्‍त होती. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी धनराज पांडे यांच्या रुपाने उपायुक्‍त मिळाला होता. तर आता पंकज जावळे यांच्याकडील अतिरिक्‍त पदभार काढून त्यांच्या जागेवर लेंगरेकर यांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास व्यक्‍त होत आहे. जावळे यांनीही मागील काही दिवसांत शहरातील कोरोना रोखण्याच्या हेतूने मोठे काम केले आहे. शहरातील घंटा गाड्यांचा प्रश्‍न, घंटागाड्यांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न, कोरोना संशयितांच्या संशयितांचा शोध घेणाऱ्या सर्व्हेच्या कामाचा प्रश्‍न आदी प्रश्‍नांची सोडवणूक आता लेंगरेकर कशाप्रकारे करणार, याची उत्सुकता आहे. 

पंकज जावळे यांच्या जागेवर बदली 
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाचे अधिकारी पंकज जावळे यांच्याकडे सोलापूर महापालिकेच्या उपायुक्‍तपदाची तात्पुरती जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या जागेवर आता महापालिकेला जमीर लेंगरेकर यांच्या रुपाने नवा उपायुक्‍त मिळाला आहे. कोरोना काळात अधिक प्रभावी काम होण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जावळे यांच्याकडे महापालिकेच्या उपायुक्‍तपदाची अतिरिक्‍त जबाबदारी दिली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee TMC Resignation : ममता बॅनर्जींना तगडा झटका; अत्यंत विश्वासू चंद्रिमा भट्टाचार्य यांनी तृणमूल पक्ष प्रमुख पदाचा दिला राजीनामा

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT