Rajesh_Kale 
सोलापूर

उपमहापौर काळे अद्याप फरार ! "अटकपूर्व'साठी केला अर्ज; पुणे, पंढरपुरात पोलिसांची पथके तळ ठोकून 

अमोल व्यवहारे

सोलापूर : महापालिकेच्या उपायुक्‍तांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले उपमहापौर राजेश काळे हे अद्यापही फरार असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. सायबर पोलिस ठाण्याकडील तंत्रज्ञानाच्या मदतीने काळे यांचा शोध घेतला जात असून, पोलिसांची पथके ही पुणे व पंढरपुरात तळ ठोकून आहेत. दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी उपमहापौर काळे यांनी वकिलांमार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

महापालिकेचे उपायुक्‍त डॉ. धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याप्रकरणी महापालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरुद्ध 29 डिसेंबर 2020 रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून काळे हे फरार आहेत. काळे यांच्यावर खंडणी मागितल्याचा सोलापुरातील दुसरा गुन्हा असून, पुण्यातदेखील त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. सोलापुरातील विजापूर नाका पोलिस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात काळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला असून, सदर बझार पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात काळे हे अद्यापही फरार आहेत. 

सदर बझार पोलिस ठाणे व शहर गुन्हे शाखा या दोन्हींकडून काळेंचा शोध सुरू असून, आयुक्‍तालयातील सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने त्यांच्या लोकेशनचा शोध घेण्यात येत आहे. 30 डिसेंबरपासून सदर बझार पोलिस ठाणे व शहर गुन्हे शाखेच्या पथकाकडून काळे यांचा पंढरपूर व पुणे येथे तपास घेण्यात येत आहे. पोलिसांची पथकेही त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. 

गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर काळे हे फरार असून, पोलिसांकडून तंत्रज्ञानाच्या जोरावर काळे यांचा शोध सुरू आहे. लवकरच ते पोलिसांच्या ताब्यात येतील. 
- संजय साळुंखे, 
पोलिस निरीक्षक, शहर गुन्हे शाखा 

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल 
दरम्यान, फरार असलेले उपमहापौर राजेश काळे यांनी या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश अनभुले यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असून, पुढील सुनावणी 6 जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकरणात उपमहापौर काळे यांच्या वतीने ऍड. अजमोद्दीन शेख काम पाहात आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT