supriya takbhate.jpg 
सोलापूर

ऑफलाइन शिक्षण पध्दतीने स्वयंअध्ययनातून साधला विद्यार्थ्यांचा विकास 

शांतीलाल काशीद

मळेगाव (सोलापूर)ः बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (सा) येथील शिक्षिका सुप्रिया ताकभाते-काशीद यांनी लॉकडाउन काळात "शाळा बंद शिक्षण चालू"या शीर्षकाखाली "ऑनलाइन शिक्षण ऑफलाईन पध्द्‌तीने"देत स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांचा विकास साधला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,विठ्ठलवाडी(ता-माढा) येथे त्या कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग,कुर्डवाडी तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. नेत्र चिकित्सक डॉ. तात्यासाहेब लहाने यांचा वर्तमानपत्रात आलेला लेख वाचून विद्यार्थ्याना ऑनलाइन शिक्षणातून होणारा डोळ्यांचा त्रास वाचवण्याची प्रेरणा घेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा संकल्प केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहिले व स्वयंअध्ययनातून कल्पना शक्तीला वाव मिळाला. 

त्यासाठी विद्यार्थी व पालकांचा व्हाट्‌स ग्रुप तयार केला व त्याद्वारे स्वयंअध्ययन व स्वयंनिर्मितीवर भर दिला. यासाठी त्यांचे पती प्राथमिक शिक्षक संदीप काशीद यांची मोलाची साथ मिळाली. स्पर्धा परीक्षा तयारी, योगासने, प्राणायाम, श्‍लोक, प्रार्थना, ओमकार, स्वच्छता व सकस आहार, चित्रकला, मातीकाम, कागदकाम, गायन, वादन, पक्षी निरीक्षण याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्याचे काम सुप्रिया ताकभाते-काशीद यांनी केले आहे. 
सामान्य ज्ञान गणित, विज्ञान, मराठी इंग्रजी विषयाच्या ऑनलाइन टेस्ट सिरीज तयार करून स्वयंअध्ययनला प्रेरणा दिली. सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध सामाजिक संस्थानी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांची व उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. लॉकडाउन काळात सुप्रिया ताकभाते-काशीद यांनी राबवलेल्या उपक्रमासाठी,शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,माढा बिट विस्ताराधिकरी बंडू शिंदे,केंद्रप्रमुख विष्णू बोबडे,मुख्याध्यापक सुभाष लोखंडे,संदीप काशीद व शिक्षक स्टाफ यांच मार्गदर्शन मिळाले. 


लॉकडाउन काळात राबविलेले उपक्रम 
दर रविवारी एक विज्ञानाचा प्रयोग 
21 जून योगदिनी योग प्रात्यक्षिकाचे आयोजन 
स्वातंत्र्यदिनानिमित्त गुगल मिटद्वारे विद्यार्थ्यांची भाषणे, रांगोळी, चित्रकला स्पर्धाचे आयोजन 
रक्षाबंधन निमीत्त बहिणीने घरातील वस्तूपासून राखी तयार करणे व भावाने बहिणीला रोप भेट देणे 
बैलपोळा सणानिमित्त मातीचा बैल तयार करणे, रंगभरण करणे 
पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजन व वृक्षारोपण 
परिसर निरीक्षणाद्वारे पक्षी, प्राणी, पाने, फुलांचा अभ्यास 
आठवड्यातुन एकदा टेस्ट सिरीज व बक्षीस योजना  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT