पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार शनिवारी शहरातील जीवनावश्य वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात आली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परगावाहून आलेल्या भाविकांची त्यामुळे कमालीची गैरसोय झाली. परगावाहून वृध्द आई, वडील आणि लहान मुलांना घेऊन आलेल्या काही भाविकांना स्थानिक लोकांकडून पिण्याचे पाणी व खाद्यपदार्थ मागून घेऊन तहानभूक भागवावी लागली.
सांगोल्यात 24 कैदी कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील सर्वांची होणार चाचणी, पोलिस दलात खळबळ
कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला असल्याने पंढरपूर शहरातील दुकाने शनिवारी कडेकोट बंद ठेवण्यात आली होती. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी परगावाहून आलेल्या भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि अन्न पदार्थ मिळवण्यासाठी भटकावे लागले. चहा टपरीसह सर्व हॉटेल्स बंद असल्याने परगावाहून आलेल्या भाविकांची कमालीची गैरसोय झाली.
पंढरपूरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी शासनाच्या आदेशामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी सुमारे आठ महिने बंद ठेवण्यात आले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांवरच पंढरपूरचे अर्थकारण प्रामुख्याने अवलंबून आहे. मंदिर बंद ठेवले गेल्याने प्रासादिक वस्तूंसह बहुतांश व्यापारी अडचणीत आले होते.
मार्कंडेय रुग्णालय स्फोटाच्या तपासासाठी मुंबईचे अधिकारी सोलापुरात दाखल
शासनाच्या निर्देशानंतर गेल्या काही महिन्यांपासून मंदिरात मुखदर्शनासाठी भाविकांना प्रवेश देणे सुरु करण्यात आले होते. त्यामुळे पंढरपुरात परगावाहून काही प्रमाणात भाविक येऊ लागले होते. विशेषतः शनिवारी आणि रविवारी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत होते. अशा परिस्थितीत आता जिल्हाधिकारी यांच्या नव्या आदेशामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने स्थानिक व्यापारी चिंतेत आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळात भाविकांसाठी खुले ठेवण्यात येत आहे. ऑनलाइन बुकींग केलेले भाविक शनिवारी दर्शनासाठी आले होते. परंतु शहरातील सर्व दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात आली असल्याने परगावाहून आलेल्या भाविकांचे हाल झाले.
प्रासादिक वस्तूंचे प्रमुख विक्रेते राजाभाऊ वट्टमवार म्हणाले, कोरोनामुळे पंढरपुरातील सर्वच व्यापारी अडचणीत आले आहेत. शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी भाविक जास्त संख्येने येत होते. त्या दोन दिवशी तरी थोडाफार व्यापार होत होता, परंतु आता या दोन्ही दिवशी दुकाने बंद ठेवावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.