devotees were delighted by Padasparsha Darshan of Vitthal pandharpur Sakal
सोलापूर

Pandharpur News : विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाने आनंदले भाविक

तब्बल अडीच महिन्यांनंतर पुन्हा सुरुवात; दर्शनासाठी तीन ते चार तास

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : तब्बल अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू झाले आहे. पदस्पर्श दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली होती.

अडीच महिन्यानंतर लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. पदस्पर्श दर्शनासाठी तीन ते चार तास लागल्याचे बेळगाव येथून आलेल्या एका भाविकाने सांगितले.

रविवारी पहाटे चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक आदींंच्या उपस्थितीमध्ये विठ्ठलाची नित्यपूजा संपन्न झाली. त्यानंतर पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले.

मंदिराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. विठुरायाचा गाभाऱ्यासह मुख्य मंदिरातील काम आटोपल्यानंतर पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळरूप देण्यासाठी आणि मंदिराचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने सुमारे ७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

माहिती दर्शनविणारी तळघराजवळ कोनशिला

येथील विठ्ठल मंदिरात सापडलेल्या तळघराचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. भाविकांना या तळघराची माहिती व्हावी यासाठी तळघराच्या बाजूला माहिती दर्शनविणारी कोनशिला बसविण्यात येणार आहे. आषाढी यात्रेपूर्वी ही कोनशिला बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT