Madha Lok Sabha Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha: गुलदस्तातील ‘आमचं काय ठरलं’ ते उलगडणार? धैर्यशील मोहिते-पाटलांचा आज पवार, शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?

Madha Lok Sabha: ज्येष्ठ नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे शिवरत्नवर विजयसिंह मोहिते- पाटील यांची भेट घेणे व स्नेहभोजनासाठी येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अकलूज : ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते- पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिका गुलदस्तात ठेवली होती. आता ठरलेलं सांगायचं असल्यानेच धैर्यशील मोहिते- पाटील यांनी रविवारी (ता. १४) ‘शिवरत्न’वर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असून, या बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्याने सर्व महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागले आहे.

‘तुम्ही या... आम्हाला बोलायचं आहे... त्यासाठीच भेटू’ अशी साद घालत धैर्यशील मोहिते- पाटील यांनी कार्यकर्त्यांना रविवारी दुपारी चार वाजता शिवरत्न बंगल्यावर भेटा, असे आवाहन केल्याने माढा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. धैर्यशील मोहिते- पाटील यांनी गुरुवारी (ता. ११) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्याकडील भाजपच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून ‘शिवरत्न’वर भेटीला येण्याची कार्यकर्त्यांना साद घातली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘वेट अँड वॉच’ म्हणत अनेक घडामोडींबाबत धैर्यशील मोहिते- पाटील यांनी उत्सुकताच ताणली होती. त्याचा रविवारी शेवट होण्याची शक्यता असून, भाजपचा राजीनामा दिल्यानंतर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते- पाटील व मोहिते- पाटील परिवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज पवार, शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश?

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे शिवरत्नवर विजयसिंह मोहिते- पाटील यांची भेट घेणे व स्नेहभोजनासाठी येणार आहेत. सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते- पाटील यांचा पक्षप्रवेश निश्चित असला तरी तत्पूर्वी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठीच त्यांनी कार्यकर्त्यांना साद घातली असून, ‘शिवरत्न’वर येण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT