सोलापूर

"धाराशिव' कारखाना शेतकऱ्यांना 200 रुपयांचा हप्ता देऊन दिवाळी करणार गोड 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) ः पंढरीतील डिव्हीपी उद्योग समूहाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्‍यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने शेतकऱ्यांना दिवाळी गोड व्हावी म्हणून 200 रुपयांचा तिसरा हप्ता व साखर वाटप करून जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे. 

कोरोना महामारीच्या काळात व अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कितपत गोड होईल याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु या कारखान्याने अन्य कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पोळा व दिवाळी हे महत्वाचे सण असतात. (कै.) औदुंबरआण्णा पाटील यांच्या काळात या सणांची शेतकऱ्यांना ओढ लागलेली असायची. कारण या दोन्ही सणांच्या वेळी साखर कारखान्यांकडून ऊस बिलांचे हप्ते शेतकऱ्यांना मिळत असायचे. त्यामुळे सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेत धाराशिव कारखान्याने जुन्या परंपरेला उजाळा देत शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 200 रुपयांचे बील देण्यात येत आहे. गेल्यावर्षी ऊसाचे प्रमाण कमी असूनही कारखाना सुरू केला. कामगारांना आणि कारखाना भागातील शेतकऱ्यांना न्याय देऊन कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी 2500 रुपये दर जाहीर केला होता. त्याप्रमाणे 2100 रुपयांचा पहिला हफ्ता म्हणून वाटप केले तर पोळा सणासाठी 200 रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले होते. उर्वरित 200 रुपये दिवाळी सणासाठी देण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी सणासाठी प्रत्येक ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आणि सभासदाला प्रत्येकी 25 किलो साखर वाटप करण्यात येत आहे, असेही डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष पाटील यांनी सागितले. 

शेतकऱ्यांना ऊस उत्पादन करताना अनेक अडचणी येत असतात. याअडचणी लक्षात घेऊन येत्या काळात शेतकऱ्यांनी ऊसाचे एकरी उत्पादन जास्तीत जास्त वाढावे यासाठी डिव्हिपी उद्योग समूहाच्यावतीने शेतकरी मार्गदशन, शेतकरी मेळावा, ऊस उत्पादन वाढीसाठी विविध विकास उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर ऊस लागवड करावी. ऊस संपेपर्यंत धाराशिव कारखाना गाळप करेल. प्रत्येक शेतकऱ्यांनी लागवडीबरोबर एकरी उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. 

संपादन ः संतोष सिरसट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT