Dharashiv esakal
सोलापूर

Dharashiv: कृषी अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये; धाराशिव जिल्ह्यात १० कृषिसेवा केंद्रांना दणका

परवाने निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

धाराशिव: जिल्ह्यातील १० कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर तीन केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर परवाने निलंबित झाल्याने कृषिसेवा केंद्रांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी ही कारवाई केली आहे.

जिल्ह्यात कृषिसेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खत, बियाणे तसेच औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र काही कृषिसेवा केंद्रचालक गडबड करतात. खत, बियाणे जास्तीच्या दराने शेतकऱ्यांना देतात. इ-पॉस मशीननुसार साठा न जुळणे, रजिस्टरला खताच्या विक्रीची नोंद नसणे.

तर काही केंद्रावर बनावट औषधांची विक्री करण्याचे प्रकार घडतात. जिल्ह्यातील निलंबित १० कृषिसेवा केंद्रचालकांमध्ये तुळजापूर तालुक्यातील सहा, भूम तालुक्यातील तीन तर लोहारा तालुक्यातील एक कृषिसेवा केंद्राचा समावेश आहे. शिवाय उमरगा तालुक्यातील एका आणि भूम तालुक्यातील दोन कृषी सेवा केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.

कारवाई सुरूच राहणार

पेरणीचा हंगाम सुरू होत आहे. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढतात. याला आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून वेगवान मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे कोणत्याही कृषिसेवा केंद्राने याबाबत बनावटगिरी करू नये. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी खते, औषधे तसेच बियाणे खरेदी करताना पावती घ्यावी. शिवाय अधिकृत कृषिसेवा केंद्रातून निविष्ठांची खरेदी करावी. खताची खरेदी केल्यानंतर इ-पॉस मशिनची पावती घ्यावी. तसेच बियाण्याची पावती हंगाम संपेपर्यंत जपून ठेवणे आवश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT