Jagdamba Temple 
सोलापूर

बापरे..! काय हे रक्तरंजित धूलिवंदन!

गो. रा. कुंभार

नरखेड (सोलापूर) ः भोयरे (ता. मोहोळ) येथील जगदंबा मातेच्या यात्रेनिमित्त धूलिवंदनाच्या दिवशी मंदिराच्या पायथ्यापासून मंदिरावर व मंदिरावरून पायथ्याकडे मोठ्या प्रमाणात दगडफेक केली जाते. यात काही यात्रेकरू जखमी होऊन अनेकांचे रक्त सांडले जाते. असे रक्तरंजित धूलिवंदन महाराष्ट्रात फक्त भोयरे येथेच पाहायला मिळते. त्यामुळेही धूलिवंदन पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येने गर्दी होते.

दगडफेकीत अनेक भाविक जखमी
तुळजापूर येथील भवानी मातेची लाडकी बहीण म्हणून ओळखली जाणारी येथील जगदंबा माता. या जगदंबा मातेची यात्रा होळीचा सण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे धूलिवंदनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होतो. या देवीची पूजाअर्चा व छबिना मिरवणूक काढली जाते. धूलिवंदनाच्या दिवशी देवीची पूजा करून भोगावती नदीपात्रात कुस्त्यांचा फड रंगतो. हा कुस्त्यांचा फड झाल्यानंतर वाजतगाजत मंदिराकडे सर्व ग्रामस्थ व यात्रेकरू येतात. काही भाविक-भक्त मंदिरात पोचतात तर काही भक्तमंडळी मंदिराच्या पायथ्याशी थांबतात. पुजाऱ्यांचा आदेश येताच मंदिरावरील लोक मंदिराच्या पायथ्याजवळील यात्रेकरू एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडांचा वर्षाव करतात. यामध्ये अनेकजण जखमी होतात. प्रसंगी रक्त सांडले जाते. परंतु या जखमींपैकी कोणीही औषधोपचार घेत नाहीत. या दगडफेकीनंतर थांबण्याचा पुजाऱ्याचा आदेश येतो तेव्हाच दगडफेक थांबून देवीच्या दर्शनानंतर यात्रेची सांगता होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, तरीही संघात एक बदल! भारताच्या Playing XI मध्ये कोणाची एन्ट्री?

AI Powered Cancer Diagnosis: तंबाखू, प्रदूषण की केमिकल? DNA पाहून कॅन्सरचं ‘खरं कारण’ शोधणार आता AI!

Hadapsar News : थायलंडमधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस अभिजीत आर्ट्सचे डायमंड वर्क

Pune Rain Update : पुढील दोन दिवस शहरात पावसाची उघडीप

पाकिस्तानने मदत नाकारली! सौदीने थेट इस्रायलकडे मागितला गुप्तचर यंत्रणेचा सपोर्ट; हुती बंडखोरांचा उद्रेक

SCROLL FOR NEXT