madhumeh1.jpg
madhumeh1.jpg 
सोलापूर

मधुमेही भारत चौगुले यांनी अशी केली कोरोनावर मात 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः कोरोना हा आजार मधुमेह रुग्णासाठी त्रासदायक असला तरी रुग्णांनी साखरेची चिंता करण्याऐवजी कोरोना होणार नाही याची काळजी व त्यासोबत तत्काळ तपासणी व उपचाराला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच मनोधैर्य देखील राखण्याची गरज आहे अशी भावना भारत चौगुले यांनी व्यक्त केली. 

विजापुर रोडवरील भागात राहणारे भारत चौगुले (वय 58) हे मागील दहा वर्षापासून मधुमेहाचे रुग्ण आहेत. पण रक्तातील साखरेचे प्रमाण कधी तीनशेपर्यंत देखील गेले नव्हते. एक दिवस अचानक त्यांना ताप आला. ताप कमी होत नाही म्हणून त्यांच्या मुलाने तपासणीला नेले. तेव्हा त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. ते थेट दवाखान्यात भरती होण्यासाठी गेले. डॉ. रामचंद्र विन्नु यांनी उपचार सुरू केले. 

उपचारादरम्यान रकशर्करा वाढली होती तेव्हा डॉक्‍टरांनी वाढलेल्या रक्तशर्करेची काळजी करु नये असा धीर दिला. तेव्हा आता कोरोनाशी लढायचेच या विचाराने ते बऱ्यापैकी ठाम होते. 
त्यांची ऑक्‍सिजन पातळी खालावली होती. तसेच त्यांच्या फुफ्फूसावर बराच परिणाम झालेला होता. केवळ संसर्ग होताच लवकर दवाखान्यात आल्याने उपचाराची संधी डॉक्‍टरांना मिळाली. त्यांच्या रक्तातील वाढलेल्या साखरेवर नियंत्रण इन्सुलीनमुळे ठेवले गेले. तसेच कोरोनाचे त्यावेळी असलेले रेमीडिसीवीर सारखी औषधे उपयोगाला येत होती. 
श्री.चौगुले यांना ऑक्‍सिजन देखील अधिक प्रमाणात द्यावे लागले. काही दिवसानंतर त्यांचा संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात आला. तसेच रक्तातील साखर देखील इन्सुलिनमुळे नियंत्रणात होती. एकविस दिवसानंतर ते बरे होऊन घरी आले. मात्र त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या बाबतीत असलेल्या सवयीमध्ये बदल केला. कोरोनानंतर त्यांचे रक्तशर्करेचे प्रमाण पुर्वीप्रमाणे स्थिर झाले आहे. 

कोरोना आधीचा आहार- विहार 

बटाटे व भात खाणे 
द्राक्षे, मनुका, चिकु व केळी खाणे 
तीन किमी चालणे 
बाहेरुन आल्यावर हातपाय धुणे 

कोरोनानंतरचा आहार-विहार 

मोसंबी व सफरचंद खाणे 
तीन किमी चालणे 
बाहेरुन आल्यावर गरम पाण्याने हात धुणे 
मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचा वापर 
बिना साखरेचा चहा घेणे 
बटाटे व भात बंद 

कुटूंबियांनी अधिक काळजी घ्यावी 
मधुमेहाच्या रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबियांनी मुळातच कोरोना संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी. लवकर निदान व उपचार हाच एक पर्याय सर्वोत्तम आहे. मधुमेह आहे म्हणून न घाबरता उपचार करुन घ्यावेत. काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. . 
- डॉ. रामचंद्र विन्नु, फ़िजीशियन व मधुमेह तज्ञ, आयसीयू आश्‍विनी हॉस्पिटल 


मनोधैर्य व तत्काळ उपचार मोलाचे 
डॉक्‍टरांचे उपचार चालू असताना मनोधैर्य प्रभावी असते. तसेच मी नंतर माझ्या आहारविहारात देखील बरेच बदल डॉक्‍टरांच्या सांगण्यावरून केले. लवकर दवाखान्यात पोहोचल्याने उपचार तातडीने झाले. 
- भारत चौगुले, विजापुर रोड  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT