Pere Patil 
सोलापूर

पंढरपुरात ग्रामपंचायत सदस्यांसाठी संवाद ग्राम कार्यशाळा ! भास्करराव पेरे-पाटील करणार मार्गदर्शन 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसाठी येत्या 24 जानेवारी रोजी पंढरपुरात संवाद ग्राम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी पाटोद्याचे (जि. औरंगाबाद) माजी सरपंच भास्करराव पेरे- पाटील हे उपस्थित राहणार आहेत. 

पंढरपूर तालुक्‍यात नुकत्याच पार पडलेल्या 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे 776 सदस्य नव्याने निवडून आले आहेत. या सर्व ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी आणि विविध विकास योजनांसंदर्भात सविस्तर माहिती व्हावी यासाठी तालुक्‍यात प्रथमच संवाद ग्राम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ही कार्यशाळा इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालयात होणार आहे. सकाळी 10 वाजता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह इतर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी येताना ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO House: घरखरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सिडको घरांच्या दरात १० टक्के कपात, पण कोणत्या? सरकारचा ऐतिहासिक निर्णय

एका क्षणात बदलेलं आयुष्य... मुंबईतील BMW hit-and-run प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा कठोर निकाल! महिलेला १.५ किलोमीटर फरफटत नेलं होतं

Paithan News : इंदेगाव शिवारातील कालव्यात अनोळखी पुरुषाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ!

Latest Marathi News Live Update: हक्कभंग प्रकरणी चार पत्रकारांना पाच दिवसांच्या कारावासाची शिफारस

Katraj Lake News : कात्रज तलावातील ३० हजार घनमीटर गाळ काढल्याचा पालिकेचा दावा; नागरिकांतून प्रश्नचिन्ह; भ्रष्टाचार झाल्याचा आरोप!

SCROLL FOR NEXT