सोलापूर

मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या दोन घटनांत दोघांचा मृत्यू !

पोलीस दोन्ही घटनांचा अधिक तपास करत आहेत

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्यात वेगवेगळ्या दोन घटनात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना मोहोळ शहरा नजीक घडली आहे, तर दुसरी घटना एकुरके (ता. मोहोळ) येथे घडली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ शहरापासून जवळच असलेल्या गायकवाड वस्ती येथे राहणारे सुधीर दामाजी गायकवाड हे सकाळी सात वाजता त्यांचे टमटम घेऊन घरापासून मोहोळ कडे जाणाऱ्या बायपास रस्त्याने निघाले असता, त्यांच्या घरापासून शंभर फूट अंतरावर त्यांना एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळ राऊंडअप नावाचे पिकावर फवारणी करण्याच्या औषधाची रिकामी बाटली पडलेली आढळून आली. त्याचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष आहे त्याचा सदरचे औषध प्राशन करून मृत्यू झाला आहे. या बाबत सुधीर दामाजी गायकवाड रा मोहोळ यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली आहे.

दुसरी घटना एकुरके ता मोहोळ येथे घडली. शुक्रवारी रात्री शशिकांत महादेव शेटे वय 50 हे रात्री घरी जेवण करून घरातून बाहेर पडले ते बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत बसतात उशिरा येथील म्हणून कुटुंबातील सर्व सदस्य नेहमी प्रमाणे झोपी गेले. शनिवार ता 18 रोजी पहाटे शशिकांत यांची पत्नी शोभा ही पहाटे तीन वाजता उठली.

शशिकांत रात्री जेवण करून गेल्यापासून घरी न आल्याचे तिने सर्वांना झोपेतून उठवुन सांगितले. सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले त्यांना मोबाइलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तोही लागला नाही. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल धर्मराज शेटे यांनी घरी येऊन शशिकांत हा शिवराम हरिदास पवार यांच्या जमिन गट नंबर 95 मधील उसाच्या फडाच्या बांधा लगत मृत अवस्थेत दिसून आल्याचे सांगितले .या घटनेची खबर आकाश शशीकांत शेटे याने मोहोळ पोलिसात दिली आहे.तपास हवालदार गणेश पोफळे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT