Digwijay 
सोलापूर

दिग्विजय बागलांचा दावा ! आमच्या एकहाती 16 आणि युतीतून नऊ अशा 25 ग्रामपंचायती ताब्यात 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : तालुक्‍यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालात बागल गटाने 16 ग्रामपंचायतींमध्ये एकहाती सत्ता आणली असल्याचा दावा बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी केला आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना दिग्विजय बागल यांनी सांगितले, की ग्रामपंचायतींच्या निकालाची आम्ही आकडेवारीसह सांगतो. यामध्ये पोथरे -9 जागा, देवळाली- 7 जागा, मांगी- 5 जागा, हिवरवाडी- 4 जागा, पिंपळवाडी- 7 जागा, शेलगाव (क)- 7 जागा, सौंदे- 4 जागा, गुळसडी- 9 जागा, शेटफळ (ना)- 6 जागा, श्रीदेवीचामाळ- 5 जागा, पाडळी- 6 जागा, बाळेवाडी- 6 जागा, निमगाव (ह)- 4 जागा, हिवरे- 4 जागा, बिटरगाव (श्री) - 5, भोसे - 5 जागा या सर्व ग्रामपंचायती बागल गटाच्या ताब्यात आल्या आहेत. 

तर बागल - पाटील - इतर युतीतून आळसुंदे बागल गट - 3 जागा, कुगाव बागल गट- 4, केडगाव बागल- 3 जागा, कविटगाव, सरपडोह, कुंभेज बागल गट- 3, आळजापूर- बागल गट 4, जातेगाव, पोटेगाव - बागल गट 5, नेरले- बागल गट 3, मिरगव्हाण - बागल गट 3, वडगाव- बागल गट 4 या ग्रामपंचायती युतीच्या माध्यामातून बागल गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आणल्या आहेत. 

ग्रामपंचायत सदस्यांबाबत बागल गट आज तालुक्‍यात प्रथम आहे. विरोधी गटाला जास्त काही हाती न लागल्यामुळे आकडेवारी फुगवून सांगत आहेत. बागल गटावरील लोकांचे प्रेम कोठेच कमी झाले नाही, हे या निवडणुकीतून दिसत आहे. आपण स्वतः लक्ष देऊन निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायतींना महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून भरीव निधी आणून देऊ. 

तालुक्‍यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर बागल गटाने एकहाती सत्ता आणली. करमाळा शहरालगतच्या सर्व गावांवर बागल गटाने सत्ता अबाधित ठेवली. देवळाली, पांडे, पोथरे, गुळसडी, पांगरे, शेलगाव (क) या मोठ्या ग्रामपंचायतीही बागल गटाने आपल्याकडे खेचून आणल्या आहेत. कोणतीही आकडेवारी फुगवून न सांगता आम्ही तालुक्‍यात सरस ठरलो आहोत, हे कार्यकर्त्यांचे यश आहे. 
- दिग्विजय बागल, 
बागल गटाचे नेते 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: PNG गॅस आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या स्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT